Nawazuddin Sidddiqui Controversy Dainik Gomantak
मनोरंजन

Nawazuddin Siddiqui Controversy: "त्याला धृतराष्ट्र किंवा गांधारी सिंड्रोम असेल" 'नवाजुद्दीन'ला हा अभिनेता असं का म्हणाला?

अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीला त्याच्या एका विधानामुळे टीकेला सामोरं जावं लागत आहे. नेमकं काय आहे प्रकरण?

Rahul sadolikar

Nawazuddin Siddiqui Controversy: नवाजुद्दीन सिद्दीकी अलीकडे सोशल मिडीयावर सतत चर्चेत असतो. अलीकडेच एका मुलाखतीत बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीने डिप्रेशनला शहरी आजार म्हटले होते.

गावातील लोकांना टेन्शन असे काही नाही, असे ते म्हणाले होते. या वक्तव्यानंतर अभिनेत्याला सोशल मीडियावर खूप टीकेला सामोरे जावे लागले. 

आता 'दहाड'फेम अभिनेता गुलशन देवय्याने यावर खरपूस समाचार घेतला आहे. देवय्या म्हणाला, 'होय, त्याला 'धृतराष्ट्र किंवा गांधारी सिंड्रोम' असेल. या विधानानंतर मी त्याला गांभीर्याने घेत नाही.

नवाजुद्दीन म्हणाला डिप्रेशन शहरी आजार

नवाजुद्दीन सिद्दीकी एका मुलाखतीत म्हणाला होता, "डिप्रेशन हा शहरी आजार आहे. मी माझा अनुभव सांगत आहे. कदाचित माझी चूक असेल. मी आता जाऊन माझ्या गावात सांगितले कि मला नैराश्य येत आहे. तर माझे गावकरी मला मारतील"

पूढे नवाज म्हणाला  माझे गावकरी मला म्हणतील 'हे काय आहे. शेतात जा, जेव , आणि झोप. त्यामुळे असे काही होत नाही असे मी म्हणेन. या सर्व गोष्टींचा शहरातील लोक खूप विचार करतात आणि त्यांच्या भावनांना अतिशयोक्ती देतात.

नवाजुद्दीनला धृतराष्ट्र गांधारी सिंड्रोम

नवाजुद्दीन सिद्दीकीच्या वक्तव्यावर आता अभिनेता गुलशन देवय्याने हिंदू महाकाव्य महाभारताचा राजा धृतराष्ट्र आणि त्यांची पत्नी महाराणी गांधारी यांचा उल्लेख केला आहे.

त्याने ट्विट केले की, हा 'धृतराष्ट्र आणि गांधारी सिंड्रोम आहे. मी त्यांच्या कलेचा खूप आदर करतो पण मी त्यांना या विषयावर गांभीर्याने घेणार नाही. 

दारू किंवा अंमली पदार्थांच्या व्यसनाधीन व्यक्तींकडे बघितले तर या समस्या गावातही आहेत. खरे तर व्यसन हा देखील एक मानसिक आजार आहे. कोणी आवडतं म्हणुन नशा करत नाही. उलट, ही सर्व या समस्यांची लक्षणे आहेत, ज्याचे निराकरण ते करू शकत नाहीत

दिग्दर्शिका लक्ष्मी अय्यरही नाराज

नवाजुद्दीनच्या वक्तव्यावर दिग्दर्शिका लक्ष्मी अय्यर यांनीही नाराजी व्यक्त केली होती. एवढा गंभीर विषय गाव-शहर या भेदात मिसळू नये, असे ते म्हणाले होते.

नैराश्य हा एक भयानक आजार आहे. असं असलं तरी, अशा मानसिक आरोग्याच्या समस्यांबाबत जागरूकता कमी आहे. अशा स्थितीत हे सर्व सांगणे योग्य नाही.

नवाज कौटुंबिक वादामुळे वर्षभर चर्चेत

नवाजची पत्नी आलियाने नवाजच्या आईवर मारहाणीचा आरोप केल्यावर नवाजुद्दीन सिद्दीकी आणि आलियाचे भांडण सुरू झाले होते.

आलियाने सांगितले की, नवाजचे कुटुंबीय तिचे शोषण करत आहेत आणि तिला त्यांच्या मालमत्तेतून बेदखल करत आहेत.

आलियाने असेही सांगितले की, नवाजपासून घटस्फोटानंतरही दोघे रिलेशनशिपमध्ये होते आणि घटस्फोटानंतरच दुसरे अपत्य जन्माला आले, मात्र नवाजने कधीही तिचा आदर केला नाही.

तर दुसरीकडे नवाजच्या आईने आलियावर आरोप करत दुसरे अपत्य नवाजचे नसून दुसऱ्याचे असल्याचे म्हटले आहे. खूप काळ वाद झाल्यानंतर हे प्रकरण मिटले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT