गोव्याचे लघुपट आज इफ्फीत... Dainik Gomantak
मनोरंजन

गोव्याचे लघुपट झळकणार आज इफ्फीत...

आज इफ्फीच्या (IFFI) गोवा (Goa) विभागात असलेले चार लघुपट (Short Film) आयनॉक्सच्या तीन क्रमांकाच्या स्क्रीनवर (Screen) झळकणार आहेत.

दैनिक गोमन्तक

गोव्यात (Goa) आंतरराष्ट्रीय सिनेमहोत्सव सुरू आहे. काल इफ्फीत (IFFI) प्रदर्शित झालेला “डिकॉस्टा हाऊस’ हाऊसफुल (Houseful) होता. चित्रपट (Movie) सुरू होण्यापूर्वी चित्रपटगृहाबाहेर लांबलचक रांग लावून उभे असलेल्या प्रेक्षकांच्या (Audience) चेहऱ्यावर गोमंतकीय चित्रपटाबद्दल असलेली उत्सुकता नक्कीच उत्साहजनक होती. आज इफ्फीच्या (IFFI) गोवा (Goa) विभागात असलेले चार लघुपट (Short Film) आयनॉक्सच्या तीन क्रमांकाच्या स्क्रीनवर (Screen) झळकणार आहेत.

लिमिट्स (मराठी) दिग्दर्शक : वर्धन कामत

कॉर्पोरेट क्षेत्रात काम करत असलेल्या दोन स्त्रियांच्या जीवनशैलीचा आणि त्यांच्या भिन्न दृष्टिकोनाचा विषय ‘लिमिट्स’ हा लघुपट मांडतो. मानसी आणि नेहा या दोघी एकाच पिढीच्या असल्या तरी या दोघींच्या विचारसरणी जुळत नाहीत. स्वातंत्र्य आणि बंधने या सार्‍या गोष्टींबद्दल एक विवाहित आणि एक अविवाहित स्त्री यांच्यामधल्या विचारविमर्षातून हा लघुपट (Short Film) पुढे सरकतो.

लिमिट्स (मराठी)

कुपांचो दर्या (कोंकणी) दिग्दर्शक : हिमांशू सिंग

जॉय मुंबईला (Mumbai) आपल्या आयुष्याची संधी शोधण्यासाठी चालला आहे. त्याला शेवटचे भेटण्यासाठी म्हणून मानवी त्याच्याकडे आली आहे. ती दोघे ज्या जागेत लहानाची मोठी झाली, त्या जागेबद्दल असणाऱ्या जॉयच्या प्रेमाला उजाळा द्यायचा प्रयत्न मानवी करते. ती त्यांची भेट जॉयसाठी एक आयुष्याचा धडा असते आणि मानवीसाठी ही भेट एक आश्चर्य घेऊन येते.

कुपांचो दर्या (कोंकणी)

पॉल 10 (कोंकणी) दिग्दर्शक : सुनील रेवणकर

पॉलला फुटबॉलर म्हणून भारतीय महिला फुटबॉल संघात स्थान मिळवायचे आहे. पण जेव्हा त्याच्या व्यक्तित्वासंबंधी फुटबॉल असोसिएशनला कळते, तेव्हा ते त्याची हकालपट्टी करतात. त्याच्या लैंगिक व्यक्तिमत्त्वाची ओळख ही त्याच्यासाठी एक आंतरिक संघर्षाची बाब बनते आणि या संघर्षाच्या जाळ्यात तो कायमचा गुरफटून जातो.

पॉल 10 (कोंकणी)

गगन (कोंकणी) दिग्दर्शक : ब्रिजेश काकोडकर

गगन आपल्या वडिलांबरोबर आपल्या खेड्यातल्या घरात राहतोय. त्याचे वडील फॉरेस्ट गार्ड म्हणून कामाला आहेत. या दोघांचेही एकमेकाबरोबरचे नाते खूप गुंतागुंतीचे आहे. कारण दोघांचेही एकमेकांबद्दल काही गैरसमज आहेत. त्यांच्या आयुष्यावर पडछाया बनून राहिलेल्या एका भीषण शोकांतिकेबद्दल कळते. घटना इतकी त्रासदायक असते की त्या दोघांचे आपसातले नाते भरकटून जाते.

गगन (कोंकणी)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Highway: जमिनी गेल्या, रस्ताही अडला; उगवेकरांचा संताप, एनएच 66 मुळे दैनंदिन जीवन विस्कळीत; मोबदल्याची अद्याप प्रतीक्षा

Bicholim Hit And Run Case: सुरक्षेचा 'तिसरा डोळा' ठरला कर्दनकाळ; अपघातानंतर पळणाऱ्या चालकाच्या मुसक्या आवळल्या, डिचोली पोलिसांची कारवाई

"वाघांचे मृत्यू अन् वन विभागाचे अपयश"; पर्यावरणप्रेमी राजेंद्र केरकर यांचा थेट प्रहार!

Goa Crime: काकाची हत्या करून मावशीकडे घेतला आश्रय! बोरी येथील दीपक नाईक हत्या प्रकरणातील संशयित नराधम पोलिसांच्या तावडीत

Goa Accident: अटल सेतूवर विचित्र अपघात! 1 नाही, 2 नाही... 7 गाड्या एकमेकांना धडकल्या, वाहतूक विस्कळीत; Watch Video

SCROLL FOR NEXT