Goa IFFI 2022|Union Min Anurag Thakur | Goa
Goa IFFI 2022|Union Min Anurag Thakur | Goa Dainik Gomantak
मनोरंजन

IFFI in Goa: 'RRR' ने भारतीय सिनेमाची खरी ताकद दाखवली'- मंत्री अनुराग ठाकूर

दैनिक गोमन्तक

भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आजपासून गोव्यात सुरु होत आहे. या महोत्सवात अनेक चित्रपटांची झलक पाहायला मिळते. यंदा 79 देशांतील तब्बल 280 चित्रपटांसह सुमारे 500 चित्रपटांच्या रिल पुढील आठवडाभर रसिकांसाठी खुल्या होतील. गोव्यातील इफ्फीचे भव्य उद्घाटन सोहळ्यापूर्वी अनुराग ठाकूर यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

अनुराग ठाकूर यांनी पत्रकारांशी संवाद साधतांना सांगितले की चित्रपट निर्माते एसएस राजामौली यांचा आरआरआर (RRR) हा 2022 मधील भारतातील सर्वात मोठा ब्लॉकबस्टर चित्रपटांपैकी एक आहे. पीरियड ड्रामाने जगभरात नाव केले आहे केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूरांना अभिमान याचा अभिमान आहे. असे ते म्हणाले आहे.

इंडियन पॅनोरमा विभागात देशभरातील 45 चित्रपटांचे प्रदर्शन होत असून यात मराठी, कोकणीसह अन्य भाषांतील चित्रपट रसिकांना पाहता येतील. भारताचा 53 वा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (IFFI) आजपासून 28 नोव्हेंबरदरम्यान होत आहे.

महोत्सवाचे उदघाटन संध्याकाळी डॉ. श्‍यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियममध्ये होणार आहे. यासाठी जगभरातील सुमारे 300 पाहुण्यांना निमंत्रित केले आहे. देशी सेलिब्रिटींची संख्याही मोठी आहे.

महोत्सवाचे उदघाटन राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई, केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर, राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासह सिनेस्टार अजय देवगन, सुनील शेट्टी, प्रभू देवा, वरुण धवन, सारा अली खान, कार्तिक आर्यन, अमृता खानविलकर, मृणाल ठाकूर, परेश रावल, इलियाना डिक्रूझ, यामी गौतम यांच्या उपस्थितीत होईल.

ऑस्ट्रियन दिग्दर्शक डायटर बर्नर यांच्या ‘अल्मा ॲण्ड ऑस्कर’ या चित्रपटाने महोत्सवाची सुरुवात होईल, तर क्रिसझटॉप झानुसी यांच्या ‘परफेक्ट नंबर’ या चित्रपटाने सांगता होणार आहे. यंदा फिल्म बाजारमध्ये अनेक नवीन उपक्रम राबवले जात असून चित्रपटांचे प्रदर्शन, नव्या दिग्दर्शकांकरिता मास्टर क्लासेस, चित्रपटांच्या खरेदी-विक्रीसाठी दिग्दर्शक आणि निर्मात्यांसाठीचे ‘बायर-सेलर मीट’ असे अनेक उपक्रम होत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Konkan Railway Fine Collection: फुकट्यांना कोकण रेल्वेचा दणका, एप्रिलमध्ये 2.70 कोटी दंड वसूल

Goa Crime: रस्ता अडविणे, दंगल माजविणे याप्रकरणी कुंकळ्ळीत 400 भाविकांविरोधात गुन्हा

Defamatory Post Lairai Devi: अन्यथा अस्नोडा जंक्शन रोखणार! भाविकांची म्हापसा पोलिस स्थानकावर धडक

Madgaon Station News: कोकण रेल्वेची मडगाव येथे रेंट अ बाईक सुविधा; विजय सरदेसाईंचा कडाडून विरोध, आंदोलनाचा इशारा

आम्ही गप्प बसू शकत नाही...अल्पवयीन मुलीच्या गर्भपातास कोर्टाची परवानगी

SCROLL FOR NEXT