Ghajini Sequel Dainik Gomantak
मनोरंजन

Amir Khans's Ghajini Sequel: पुन्हा एकदा हाय व्होल्टेज ड्रामा घेऊन संजय सिंघानिया परततोय?... ..गजनीच्या सिक्वलच्या चर्चेला उधाण

आमिर खानचा गजनी 2 लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची चर्चा आहे.

Rahul sadolikar

Amir Khans's Ghajini Sequel: १५ वर्षांपूर्वी 'गजनी' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाच्या कथेने प्रेक्षकांच्या हृदयाला स्पर्श केला, त्यांना हेलावले आणि त्यांचे डोळे ओले केले.

संजय सिंघानिया आणि कल्पना यांची प्रेमकहाणी आजपर्यंत कोणीही विसरले नाही. आमिर खान आणि असीनने दमदार अभिनयाने या पात्रांमध्ये प्राण फुंकले होते. 

आता इतक्या वर्षांनी संजय पुन्हा एकदा पडद्यावर पुनरागमन करत आहे. होय. आमिर खान 'गजनी2' म्हणजेच 'गजनी 'चा सिक्वेल बनवणार आहे. यासाठी तो आता साऊथकडे वळला आहे आणि यासाठी आमिरच्या 'पुष्पा' स्टार अल्लू अर्जुनचे वडील अल्लू अरविंद यांच्याशी चर्चा सुरू आहेत.

'लाल सिंह चढ्ढा' फ्लॉप झाल्यानंतर आमिर खानने चित्रपटातून ब्रेक घेतला. मात्र, गेल्या वर्षी त्याने आरएस प्रसन्ना यांच्या 'चॅम्पियन्स' चित्रपटाची निर्मिती करत असल्याची घोषणा केली होती. आता नवीन बातम्या येत आहेत की तो 2008 मध्ये रिलीज झालेल्या 'गजनी' या अॅक्शन-थ्रिलर सिनेमाचा सिक्वेल बनवणार आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार आमिर याबाबत सतत हैदराबादला जात असून या प्रोजेक्टबाबत निर्माता अल्लू अरविंद यांच्याशी बऱ्याच दिवसांपासून चर्चा सुरू आहे.

गेल्या आठवड्यात आमिर खान अल्लू अरविंदला भेटला होता, असे रिपोर्ट्समध्ये सांगण्यात आले होते. दोघांनी अनेक प्रोजेक्ट्सच्या कल्पनेवर चर्चा केली होती. दोघेही एकत्र काम करण्यास उत्सुक आहेत. पण ही फक्त एक चर्चा असल्याचं बोललं जात आहे. 

अजुनतरी सिक्वलची घोषणा झाली नाही. असे असले तरी, दोघांनाही संजय सिंघानियाची कथा पुढे नेण्याची इच्छा असून काही महिन्यांत स्क्रिप्ट फायनल करणार असल्याचे बोलले जात आहे.  पण सध्या तरी सर्व काही गुप्त ठेवण्यात आले आहे.

आमिरला फिल्म इंडस्ट्रीकडून डझनभर ऑफर्स येत असल्याचंही रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. एका सशक्त आशयासाठी तो स्नेहा रजनीसोबत चर्चेत आहे. तिला प्रशांत नीलच्या पॅन इंडिया चित्रपटाची ऑफर देखील ज्युनियर एनटीआरसोबत देण्यात आली आहे, परंतु हे सर्व प्रकल्प सध्या 'वाटाघाटी' टप्प्यात आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Nanoda: सफर गोव्याची! मंदिरातल्या नादमधूर सुस्वरांनी भक्तीमय होणारे, सर्वांना भुरळ घालणारे टुमदार 'नानोडा'

High Court: बलात्काराचा आरोप सिद्ध करण्यासाठी 'पेनेट्रेशन' अनिवार्य..! 20 वर्षांनंतर आरोपीला हायकोर्टाचा मोठा दिलासा

Shiv Jayanti Wishes In Marathi: जय भवानी, जय शिवाजी! शिवजयंतीनिमित्त प्रियजनांना पाठवा 'या' खास मराठी शुभेच्छा!

8th Pay Commission: लवकरच लागू होणार 8वा वेतन आयोग! कोणाची होणार चांदी अन् कोणाला बसणार फटका? जाणून घ्या सविस्तर

Seema Haider: नव्या घरात हलला पाळणा, पाकिस्‍तानहून भारतात आलेल्‍या सीमा हैदरनं दिला गोंडस मुलाला जन्म; पुन्हा बनली 'आई'

SCROLL FOR NEXT