Gen-Z salary Viral Video: एखादी गोष्ट प्रभावीपणे मांडण्यासाठी संवाद कौशल्य अत्यंत महत्त्वाचं असतं. आजकालच्या 'जेन-झी' पिढीमध्ये हे कौशल्य वेगळ्याच स्तरावर पोहोचलंय. ते असे काही शब्द आणि संकल्पना वापरतात की, समोरच्याला नेमकं काय बोलायचंय आहे, हे समजून घेणं अवघड होतं. उदाहरणार्थ, वडापाव खाल्ल्यावरही 'दादा किती बक्स झाले?' असं विचारणारी मुलं पाहायला मिळतात. सध्या सोशल मीडियावर असाच 'रोडसाईड इंटरव्यू' मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.
अशीच एक मुलाखत देणारी तरुणी सध्या सोशल मीडियावर प्रचंड गाजते आहे. तिच्या उत्तरामुळे ती अल्पावधीतच व्हायरल झालीये.
एका इन्फ्लूएन्सरने तिला तिच्या पगाराबद्दल विचारलं. त्यावर तिने अगदी आत्मविश्वासानं आणि सौम्यपणे 'मी लाखात कमवते' असं उत्तर दिलं.
तिचे हावभाव पाहून ती खरं बोलतेय असं वाटलं मात्र, त्यानंतर तिने दिलेलं उत्तर ऐकून मुलाखत घेणारा आणि व्हिडिओ पाहणारे सगळेच चक्रावून गेले. 'किती लाख कमवतेस?' असं विचारल्यावर तिने 'मी ०.१ लाख कमवते' असं उत्तर दिलं.
अर्थात, ती फक्त १० हजार रुपये कमवते हे समजल्यावर नेटकऱ्यांनी तिच्या उत्तराची खूप वाहवा केली. तिने स्वतःची आर्थिक परिस्थिती थेट न सांगता इतक्या अचूक आणि हुशारीने मांडली म्हणून अनेकांनी तिला 'मॅथ क्वीन' असं नावही दिलंय, तर काही जणांनी तिला 'ट्रोल' करण्याचा प्रयत्न केलाय.
या व्हिडिओने मात्र अनेकांना खळखळून हसायला लावलं. खोटं न बोलता वेगळ्या पद्धतीने परिस्थिती मांडणाऱ्या या मुलीचा व्हिडिओ खरा आहे की, तो 'मेडअप' आहे, हे अजून स्पष्ट झालेले नाही. मात्र, नवी पिढी अशाच काही वाक्यांचा वापर करून इतरांना कायमच पेचात पाडत असते, हे यातून स्पष्ट होतं.
आजकालची ही पिढी आपल्या बोलण्यात अनेक नवीन शब्द आणि संकल्पना वापरते, ज्यामुळे त्यांची स्वतःची एक वेगळी भाषाशैली तयार झाली आहे. 'हो' शब्दाऐवजी 'बेट', 'खरंच' ऐवजी 'नो कॅप', 'मस्त' ऐवजी 'लिट'आणि 'सुंदर' ऐवजी 'फायर असे विविध शब्द ही पिढी वापरते. त्यांची ही स्वतःची वेगळी भाषा आणि शैली आहे असं म्हणायला हरकत नाही, जी आता सोशल मीडियामुळे अधिकच व्हायरल होतेय.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.