Gangubai  Dainik Gomantak
मनोरंजन

गंगूबाई काठियावाडी चित्रपटाची '100 कोटी क्लब'मध्ये एंट्री

गंगूबाईने भारतीय बॉक्स ऑफिसवर जवळपास 70 कोटींची कमाई केली आहे.

दैनिक गोमन्तक

आलिया भट्टचा गंगूबाई काठियावाडी चित्रपट बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करत आहे. चित्रपटाला भारतासह जगभरातील प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद दिला आहे. चित्रपटाने जगभरातील बॉक्स ऑफिसवर 100 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे.

गंगूबाईची विदेशात धूम

संजय लीला भन्साळी दिग्दर्शित गंगूबाई काठियावाडीने जगभरातील बॉक्स ऑफिसवर 108.3 कोटी रुपये कमावले आहेत. भन्साळी प्रॉडक्शन हाऊसने याबाबतची पोस्ट सोशल मीडियावर (Social Media) शेअर केली आहे. गंगूबाईने भारतीय बॉक्स ऑफिसवर (Box Office) जवळपास 70 कोटींची कमाई केली आहे. चित्रपटाच्या कमाईत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे.

भारतात सुद्धा गंगूबाईचा दबदबा

रिलीजच्या पहिल्या दिवशी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 10.5 कोटींचा गल्ला जमवला. पहिल्या वीकेंडलाही या चित्रपटाने (Movie) चांगली कमाई केली. चित्रपट समीक्षक आणि विश्लेषक तरण आदर्श यांच्या मते, गंगूबाई काठियावाडी ही कोरोनाकाळात रिलीज होणारी तिसरी सर्वात मोठी ओपनर ठरली आहे. या यादीत पहिले नाव अक्षय कुमारचा चित्रपट सूर्यवंशीचे आहे, तर दुसऱ्या स्थानी रणवीर सिंगचा 83 चित्रपट आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sporting Club Goa: दीपांकुर शर्मा यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी; आय-लीग 2 मध्ये दमदार कामगिरीचे लक्ष्य

Goa Research: त्वचेच्या उपचारात 3D तंत्रज्ञानाची नवी झेप! स्वस्त आणि सुरक्षित जलजेल विकसित

Colvale Central Jail: कोलवाळ कारागृहात वाईननिर्मितीचा आरोप; प्रशासनाचा स्पष्ट इन्कार, 'सुरक्षा कडक केल्याने नाराजांचे षड्‌यंत्र'

Illegal Hill Cutting Case: 4 वर्षांच्या लढ्याला अखेर यश! हडफडेची बेकायदा कापलेली टेकडी पूर्ववत; हायकोर्टानं प्रकरण काढलं निकाली

Toxic Movie Release: 'टॉक्सिक'चा धमाका! रॉकस्टार यशची रुपेरी पडद्यावर धमाकेदार एन्ट्री; थिएटर्सबाहेर चाहत्यांची तोबा गर्दी VIDEO

SCROLL FOR NEXT