Darren Kent Passes Away Dainik Gomantak
मनोरंजन

Darren Kent Passes Away : 'गेम ऑफ थ्रोन्स'च्या चाहत्यांना धक्का...या प्रसिद्ध अभिनेत्याचा मृत्यू

गेम ऑफ थ्रोन्स या जगप्रसिद्ध वेब सिरीजमध्ये गॉथर्डची भूमीका करणाऱ्या अभिनेता डॅरेन केंटने जगाचा निरोप घेतला आहे.

Rahul sadolikar

विंटर इज कमिंग, मदर ऑफ ड्रॅगन्स, खलिसी हे शब्द ऐकून तुम्हाला नक्कीच निबीड अरण्याची आणि गादीसाठी चाललेल्या संघर्षाची गोष्ट सांगणाऱ्या गेम ऑफ थ्रोन्स या जगप्रसिद्ध वेब सिरीजची आठवण येईल.

या सिरीजच्या जगभरातल्या चाहत्यांसाठी एक दु:खद बातमी नुकतीच समोर आली आहे. या सिरीजमधल्या गोथर्डने अर्थात डॅरेन केंटने अखेरचा श्वास घेतला आहे . तोच गॉथर्ड ज्याचे प्राणी आणि मूल डेनरीसच्या ड्रॅगनने मारले होते.

केंटचा दुर्दैवी मृत्यू

गेम ऑफ थ्रोन्समधील भूमिकेसाठी प्रसिद्ध असलेला अभिनेता डॅरेन केंटचे निधन झाले आहे. यूएस-आधारित न्यूज आउटलेट व्हरायटीच्या वृत्तानुसार, केंटने 11 ऑगस्ट रोजी अखेरचा श्वास घेतला.

त्यांच्या निधनाच्या बातमीची पुष्टी त्याची प्रतिभा एजन्सी केरी डॉड असोसिएट्सने मंगळवारी ट्विटरवर पोस्ट केलेल्या निवेदनात केली.

निवेदनात म्हटले

"खूप दुःखाने आम्हाला सांगावे लागते की आमचा प्रिय मित्र आणि क्लायंट डॅरेन केंट यांचे शुक्रवारी निधन झाले. त्याचे आईवडील आणि जिवलग मित्र त्याच्या पाठीशी होते. या कठीण काळात आमचे विचार आणि प्रेम त्यांच्या कुटुंबासोबत आहेत. माझ्या मित्राला आरआयपी करा," हे भावनिक निवेदन डॅरेनच्याच एजन्सीने प्रसिद्ध केले.

गोथर्डची भूमीका

केंटचा जन्म आणि संगोपन एसेक्समध्ये झाल. त्याने इटालिया कॉन्टी येथे 2007 मध्ये पदवी संपादन केली. त्याची पहिली प्रमुख भूमिका 2008 च्या हॉररमध्ये होती. नंतर त्याने एमी-विजेत्या गेम ऑफ थ्रोन्समध्ये काम केले. गेम ऑफ थ्रोन्समध्ये केंटने स्लेव्हर्स बे मधील गोथर्डची भूमिका साकारली होती.

केंटच्या अविस्मरणिय भूमीका

2023 च्या Dungeons and Dragons: Honor Among Thieves या चित्रपटात तो अगदी अलीकडेच पुन्हा जिवंत झालेलं पात्र म्हणून दिसला होता.

केंटने स्नो व्हाइट अँड द हंट्समन, मार्शल लॉ, ब्लडी कट्स, द फ्रँकेन्स्टाईन क्रॉनिकल्स, ब्लड ड्राइव्ह आणि बर्ड्स सॉरो या चित्रपटात अविस्मरणिय भूमीका केल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa CM Helpline: तुमच्या तक्रारी थेट CM सावंत ऐकणार, एका फोनवर प्रश्न सुटणार; 24x7 नागरिकांसाठी 'मुख्यमंत्री हेल्पलाईन' सुरू

Bonderam: 'दिवाडी बेट' सजले! ‘बोंदेरा’ उत्साहात साजरा; सामुदायिक एकतेचे आणि सांस्कृतिक वैभवाचे दर्शन

Salvador Do Mundo: साल्वादोर द मुंदचे ग्रामस्थ आक्रमक! कचरा, मैदानाची दुरवस्था, अनधिकृत बांधकामांचा प्रश्न ऐरणीवर

Bhoma: 'मातीच्या भरावामुळे गाव धोक्यात'! भोम ग्रामसभेत संताप; चौपदरी रस्त्याचा प्रश्‍नही चर्चेत

Goa Live News: गोव्यातील फसवणूक प्रकरणात सिंगापूरच्या रहिवाशाला अटक!

SCROLL FOR NEXT