Amitabh Bachchan: नरेंद्र मोदींच्या भूमिकेत दिसणार 'बीग बी'? चित्रपटाची कथा आली समोर

Amitabh Bachchan: त्यांच्यापेक्षा मोठ्या नायकाचा विचार करू शकत नाही.
Amitabh Bachchan
Amitabh BachchanDainik Gomantak
Published on
Updated on

Amitabh Bachchan: बॉलीवूडचे बीग बी म्हणजेच अमिताभ बच्चन एका नव्या भूमिकेत प्रेक्षकांचे मनोरंजन करणार असल्याचे म्हटले जात आहे. मिळालेल्या माहीतीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भूमिकेत दिसण्याची शक्यता आहे.

टॉयलेट: एक प्रेम कथा' आणि 'परी' सारखे चित्रपटांच्या निर्मात्या प्रेरणा अरोरा लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर बायोपिक बनवणार आहेत. आता मिळालेल्या माहीतीनुसार, प्रेरणा अरोराला पीएम मोदींवर चित्रपट बनवायचा आहे.

तिच्या म्हणण्यानुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतातील सर्वात डायनॅमिक, देखणे आणि सक्षम व्यक्ती आहेत आणि ती त्यांच्यापेक्षा मोठ्या नायकाचा विचार करू शकत नाही.

आता पंतप्रधान मोदींच्या भूमिकेत कोणता अभिनेता दिसणार याचाही खुलासा केला प्रेरणाने केला आहे. तिने म्हटल्यानुसार पंतप्रधान मोदींच्या भूमिकेत अमिताभ बच्चन यांना कास्ट करायचे आहे कारण तिला वाटते की पंतप्रधान मोदींच्या उंचीला दुसरा कोणताही अभिनेता शोभणार नाही.

नरेंद्र मोदींच्या बायोपिकमध्ये काय असेल कथा

नरेंद्र मोदी बायोपिकमध्ये पंतप्रधान झाल्यानंतर त्यांच्या जीवनाशी संबंधित त्यांच्या विविध पैलू असतील, असेही प्रेरणा अरोरा यांनी म्हटले आहे.

देशाच्या अर्थव्यवस्थेच्या विकासाच्या उद्देशाने अनेक धोरणांचा स्विकार करुन परकीय कंपन्याना भारतात आणण्यापासून ते कोविड-19 महामारी हाताळण्यापर्यंत आणि लसीचे वितरण करण्यापर्यंतच्या अनेक कामांचा त्याच्या स्क्रिप्टमध्ये समावेश असणार आहे.

Amitabh Bachchan
Raveena- Karishma Catfight: करिश्मा अन् रवीना यांचे 'हे' भांडण तुम्हाला माहीत आहे का?

दरम्यान, विवेक ओबेरॉयने पंतप्रधान नरेंद्र मोदींची साकारलेल्या भूमिकेविषयी प्रेरणा अरोरा यांना विचारले तेव्हा त्यांना तो चित्रपट पाहिले नसल्याचे म्हटले आहे. याबरोबरच, या बायोपिकमध्ये नरेंद्र मोदींच्या इमेजला पूर्ण न्याय दिला जाईल असे म्हटले आहे. त्यामुळे आता या बायोपिकमध्ये नेमके का दाखवले जाणार याबद्दल उत्सुकता लागली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com