Gadar 2 Official Trailer Dainik Gomantak
मनोरंजन

Gadar 2 Trailer Release: 'गदर 2' चा धमाकेदार ट्रेलर रिलीज, सनी देओल...!

Manish Jadhav

Gadar 2 Official Trailer: बहुप्रतिक्षित चित्रपट 'गदर 2' चा धमाकेदार ट्रेलर आज (26 जुलै 2023 रोजी) संध्याकाळी 7:30 वाजता रिलीज झाला. आता चाहते चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक आहेत.

विशेष म्हणजे, या चित्रपटात पुन्हा एकदा अमिषा पटेल आणि सनी देओलची रोमँटिक जोडी पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचा टीझर आधीच रिलीज झाला होता, त्यानंतर त्याची काही गाणीही रिलीज करण्यात आली होती.

त्यानंतर आता सनी पाजीने 'गदर 2' चा ट्रेलर रिलीज करुन पुन्हा एकदा खळबळ उडवून दिली आहे. चित्रपटाचा ट्रेलर रिलीज होताच सोशल मीडियावर (Social Media) चांगलाच व्हायरल झाला आहे. 'गदर 2' 11 ऑगस्ट 2023 रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. आता हा चित्रपट पाहण्याची चाहत्यांची उत्सुकता आणखीनच वाढली आहे.

गदर 2 चा धमाकेदार ट्रेलर रिलीज

'गदर 2' चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये, सनी देओल (Sunny Deol) उर्फ ​​तारा सिंगने त्याच्या अॅक्शन पॅक्ड सीनने चाहत्यांना आकर्षित केले आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये अनेक अॅक्शन सीन्स आणि दमदार डॉयलॉग आहेत.

विशेष म्हणजे, डॉयलॉगही गदर चित्रपटाची शान आहेत. चित्रपटाच्या टीझरमध्ये अमिषा पटेल गायब होती, मात्र आता ट्रेलरमध्ये अमिषाची झलक पाहायला मिळत आहे. सनी आणि अमिषा यांची रोमँटिक केमिस्ट्रीही चाहत्यांच्या पसंतीस उतरली आहे.

दुसरीकडे, या चित्रपटाचा पहिला भाग 2001 मध्ये रिलीज झाला होता, जो ऑलटाइम फेमस चित्रपटांच्या यादीत आहे. गदरच्या पार्ट 1 मध्ये सनी देओल, अमिषा पटेल (Amisha Patel) आणि उत्कर्ष शर्मा मुख्य भूमिकेत होते. 'गदर 2' आता 11 ऑगस्टला थिएटरमध्ये रिलीज होत आहे. विशेष म्हणजे, अक्षय कुमारचा OMG 2 चित्रपटही या तारखेला मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

बॉलीवूड, टॉलीवूडचा प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक जानी मास्टरला गोव्यात अटक, सहकारी महिलेचा 6 वर्षापासून लैंगिक छळ केल्याचा आरोप

Ratnagiri Crime News: स्वप्नात दिसला मृतदेह, सिंधुदुर्गातील तरुण पोहोचला पोलीस ठाण्यात; तपासात उघड झाली धक्कादायक माहिती

तम्नार प्रकल्प रखडणार! कर्नाटकचे शेपूट वाकडेच, सिद्धरामय्यांनी कळसा-भांडुराचा मुद्दा केला उपस्थित

रस्त्यांच्या अवस्थेवरुन काँग्रेस आक्रमक; दहा दिवसांत काम सुरु न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा

फोंड्यात 'हेडा गॅब्लर'चा प्रयोग; 125 वर्षापूर्वी लिहलेले नोर्वेजियन नाटककाराचे नाटक पाहण्याची संधी

SCROLL FOR NEXT