Kajal Aggarwal and baby Dainik Gomantak
मनोरंजन

Kajal Aggarwal: काजल अग्रवालने शेअर केले मुलासोबात सुट्टी एन्जॉय करतानाचे फोटो

काजलचा मुलगा नील याची ही पहिलीच सुट्टी

दैनिक गोमन्तक

अभिनेत्री काजल अग्रवाल तिच्या मुलासोबत फिरायला गेली आहे. काजलचा मुलगा नील याची ही पहिलीच सुट्टी आहे. काजलने आपल्या मुलासोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. बॉलिवूड आणि टीव्ही जगतातील बहुतेक स्टार्स सध्या सुट्टी एन्जॉय करताना दिसत आहेत. राहुल वैद्य, दिशा परमार असो किंवा कतरिना कैफची मालदीव ट्रिप असो. आता या यादीत काजल अग्रवाल आणि दीपक किचलू यांचाही समावेश झाला आहे. (kajal aggarwal and baby neil from goa photos viral)

आजकाल काजल तिचा मुलगा नीलसोबत गोव्यात आपला वेळ घालवत आहे. काजलच्या मुलाची ही पहिलीच सुट्टी आहे. काजलने तिच्या मुलाचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे, ज्यामध्ये नीलची छोटी पावले दिसत आहेत. नीलच्या या फोटोवर चाहत्यांकडून लाईक आणि कमेंटची बरसात केली जात आहे.

नीलची पहिलीच सुट्टी

काजल अग्रवाल आणि दीपक किचलू या जोडप्यासाठीही ही सुट्टी खूपच खास आहे, कारण त्यांच्या मुलाची ही पहिलीच सुट्टी आहे. काजलने शेअर केलेल्या फोटोमध्ये ती आपल्या मुलासोबत समुद्रकिनारी दिसत आहे. नीलचे छोटे पाय वाळूला स्पर्श करण्याचा प्रयत्न करत आहेत. या फोटोसोबत नीलची पहिली सुट्टी #beachbaby #forthefirsttime असे काजलने लिहिले आहे.

काजलच्या या पोस्टवरून स्पष्ट दिसून येते आहे की, तिला सुट्ट्या एन्जॉय करायला किती आवडते. आई झाल्यानंतर काजलने चित्रपटांमधून ब्रेक घेतला आहे आणि सध्या ती कुटुंबाला पूर्ण वेळ देत आहे. याआधी ती साऊथच्या आचार्य या चित्रपटामुळेही चर्चेत आली होती. या चित्रपटातील काजल अग्रवालचा शूट केलेला भाग काढून टाकल्यामुळे निर्मात्यांना सुमारे 7.5 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे वृत्त होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

गोव्यातील सार्वजनिक सेवेतील वाहनांना GPS ट्रॅकिंग आणि पॅनिक बटन बसविण्याची सूचना, 30 नोव्हेंबरपर्यंत मुदत

"सरकारी नोकर भरतीत अन्याय नको", दादा वैद्य चौकात मराठीप्रेमींकडून संताप व्यक्त; धो धो पावसातही मराठीप्रेमींचा निर्धार

Goa Water Taxi: गोव्यात लवकरच धावणार वॉटर मेट्रो टॅक्‍सी! प्रवाशांना मिळणार नवा पर्याय, नदीपरिवहन मंत्री सुभाष फळदेसाईंची माहिती

Shreyas Iyer Health Update: श्रेयस अय्यरने दुखापतीबद्दल दिली मोठी अपडेट, सोशल मीडियावर शेअर केली पोस्ट

Goa Live Updates: रेल्वेच्या धडकेने मये येथे रेडा ठार

SCROLL FOR NEXT