Oscars  Awards
Oscars Awards Dainik Gomantak
मनोरंजन

Oscar 2023: ऑस्करच्या शर्यतीत कोणते चित्रपट आहेत,जाणून घ्या

दैनिक गोमन्तक

Oscar 2023: ऑस्कर पुरस्कार हा संपुर्ण चित्रपटसृष्टीसाठी महत्वाचा पुरस्कार मानला जातो. एखाद्या चित्रपटाला ऑस्कर पुरस्कार मिळणे हा अत्यंत प्रतिष्ठेचे मानले जाते. दरवर्षी भारताकडून ऑस्करसाठी गाजलेले आणि उत्तम चित्रपट पाठवण्यात येतात.

यावर्षीसुद्धा भारता( India)ने द काश्मीर फाइल्स, छेल्लो शो, आरआरआर असे चित्रपट आणि काही डॉक्युमेंटरी चित्रपट पाठवण्यात आले आहेत. छेल्लो शो आणि आरआरआर या चित्रपटांना ऑस्करसाठी शॉर्टलिस्ट करण्यात आले होते. आता काही चित्रपट नॉमिनेशनसाठी निवडण्यात आले आहेत. आरआरआर( RRR) मधील नाटू नाटू या गाण्याला ऑस्करमध्ये ओरिजनल सॉंग्स या गटात नामांकन मिळाले आहे. याबरोबरच 'ऑल दॅट ब्रीथ्स'या माहितीपटाला 'डॉक्युमेंटरी फीचर फिल्म' या श्रेणीत नामांकन मिळाले आहे.

दरम्यान, अवतार : द वे ऑफ वॉटर , थार,द बेंचेस ऑफ इनशेअरिन , एलविस , एवरीथिंग एवरीवेयर ऑल अॅट वन्स, द फेबलमन्स , टॉप गन मेव्हरिक , ट्रिंगल ऑफ सॅडनेस या चित्रपटांनी सर्वोत्कृष्ट सिनेमा या श्रेणीत नामांकन मिळवत आपला दबदबा निर्माण केला आहे. कॅटे ब्लेनचेट, अॅना दे अर्मास, मिचेले व्हिल्यम्स या अभिनेत्रींना सर्वोत्कृष्ट अभिनेत्री श्रेणीत नामांकन मिळाले आहे. ऑस्टिन बस्टलर , कोलिन फरेल , ब्रेडन फ्रासर , पौल मस्कल या अभिनेत्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या श्रेणीत नामांकन मिळाले आहे.

सर्वोत्कृष्ट माहितीपटाच्या श्रेणीत ऑल दॅट ब्रीथ्स, ऑल द ब्यूटी अॅन्ड द ब्लडशेड,फायर ऑफ लव्ह,अ हाऊस मेड ऑफ स्पील्नटर्स या माहितीपटांना नामांकन मिळाले आहे. तर मूळ पटकथेच्या श्रेणीत द बॅनशीस ऑफ इनशिरिन, एवरीथिंग एवरीवेयर ऑल अॅट वन्स,ट्रॅंगल ऑफ सॅडनेस या पटकथांना नामांकन मिळाले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kanguva: 'कंगुवा'चा टीझर घालतोय धूमाकूळ; गोव्यासह ‘या’ खास ठिकाणी झालं बीग बजेट चित्रपटाचं शूटिंग

Goa Congress: सार्दिन घरात बसून विरियातोंचा प्रचार करतात; पाटकरांनी टोचले MP फ्रान्सिस यांचे कान

Prajwal Revanna: आम्ही व्हिसा दिला नाही… प्रज्वल रेवन्ना जर्मनीला पळून गेल्याच्या प्रश्नावर परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया

Shashi Tharoor In Goa: भाजपला धक्का बसणार, 400 नव्हे 200 पार करने देखील जड जाणार - थरुर

Goa Police : २४ वर्षांपासून अजूनही ‘ते’ न्यायाच्या प्रतिक्षेत; बडतर्फ पोलिसाची व्यथा

SCROLL FOR NEXT