संजय लीला भन्साळी दिग्दर्शित Sanjay Leela Bhansali : 'पद्मावत'या चित्रपटाला झाली ५ वर्षे पूर्ण ; जागवल्या आठवणी

संजय लीला भन्साळी दिग्दर्शित आणि दिपीका पदुकोण, रणबीर सिंह आणि शाहिद कपूर यांच्या प्रमुख भूमीका असलेला हा चित्रपटाला
Deepika Padukone
Deepika Padukone Dainik Gomantak
Published on
Updated on

Sanjay Leela Bhansali's film 'Padmaavat' has completed 5 years संजय लीला भन्साळी हे बॉलीवूडचे असे दिग्दर्शक आहेत ज्यांच्या चित्रपटांना रिलीजच्या आधीच वादाची परंपरा आहे. भन्साळी यांच्या चित्रपटांना वादानंतरही प्रसिद्धी मिळते आणि ते व्यावसायीकदृशष्ट्या चांगलेच यशस्वी होतात. 5 वर्षांपूर्वी रिलीज झालेल्या भन्साळी यांच्या पद्मावतला आता 5 वर्षे पूर्ण झाली आहेत.

प्रसिद्ध सिनेनिर्माते संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali') यांचा 'पद्मावत'हा सुपररहिट चित्रपट ५ वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला होता. तसेच, संजय लीला भन्साळी दिग्दर्शित, या चित्रपटात दिपीकाचं सौंदर्य होतं , शाहिद कपूरचं शौर्य दिसलं एकंदरीत या ऐतिहासीक प्रेमकथेने प्रेक्षकांची मने जिंकली होती.

दरम्यान, या सिनेमात दीपिका पदुकोण, शाहिद कपूर आणि रणवीर सिंग यांच्या मुख्य भूमिका होत्या आणि त्या वर्षातील हा सर्वात मोठा चित्रपट होता.आज या चित्रपटाला प्रदर्शित होऊन 5 वर्षे झाली असताना, भन्साळी प्रॉडक्शनने चित्रपटातील काही स्निपेट्स सोशल मीडियावर शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले, "With beauty, grace, honor, and love. Here’s reliving the spectacle with #5YearsOfPadmaavat"

संजय लीला भन्साळी हे त्यांच्या सिनेमॅटिक कौशल्यासाठी जगभरात ओळखले जातात. 'पद्मावत', 'जोधा अकबर', 'बाजीराव मस्तानी', 'रामलीला', आणि 'गंगूबाई काठियावाडी' यांसह अनेक चित्रपटांनी एक फिल्ममेकर म्हणून त्यांच्या यशाला अधोरेखीत केलं आहे.

Deepika Padukone
Natu Natu in Oscars 2023: RRR च्या 'Natu Natu'ला अंतिम नामांकन , भारताला यंदा ऑस्कर मिळणार?

एक यशस्वी दिग्दर्शक असण्यासोबत संजय लीला भन्साळी एक उत्कृष्ट संगीत दिग्दर्शक सुद्धा आहेत. त्यांच्या बऱ्याच चित्रपटांना त्यांनी स्वत:च संगीत दिले आहे. त्यांनी संगीत दिलेल्या कित्येक गाण्यांना प्रेक्षकांनी चांगलाच प्रतिसाद दिला आहे.

अलीकडेच, त्यांचा 'सुकून' नावाचा पहिला म्युझिकल अल्बम रिलीज झाला. हे म्युझिक कंपोजिशन्स ग्लोबल हिट असून, संगीत चाहत्यांमध्ये याची चर्चा रंगत आहे. तसेच, संजय लीला भन्साळी यांनी यापूर्वी गुजारिश, गोलियों की रासलीला - राम-लीला आणि गंगूबाई काठियावाडी यांसारख्या दिग्दर्शित चित्रपटांसाठी देखील संगीत दिले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com