देशात कोरोनाचा प्रादुर्भाव मागील काही काळात झपाट्याने वाढला. त्यामुळे त्याचा परिणाम आपोआप अनेक क्षेत्रांवर झाला. यातीलच एक क्षेत्र होते ते म्हणजे मनोरंजन. मनोरंजन क्षेत्राला मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला. हातावर पोट असणाऱ्यांच्या नोकऱ्या गेल्या. या कोरोना काळात मनोरंजन क्षेत्राला मात्र वेगळी कलाटणी मिळाली. अनेक दिग्गज चित्रपट दिग्दर्शक वेबसीरिजकडे वळाले. त्यांनी अनेक उत्तमोउत्तम वेब सीरीज बनवल्या आहेत. याच पाश्वभूमीवर हिंदी हार्टलँडबद्दल बोलायचे झाले तर, या हार्टलँडमध्ये मध्य प्रदेश (Madhya Pradesh), राजस्थान, छत्तीसगड (Chhattisgarh), बिहार, उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) या राज्यांचा समावेश होतो. यामध्येही उत्तर प्रदेश हे राज्य आपल्या चित्रपट निर्मात्यांना सर्वात प्रिय आहे. त्यामुळेच उत्तर प्रदेशच्या पार्श्वभूमीवर आधारित चित्रपट आणि वेब सीरीज (Web Series) मोठ्याप्रमाणात बनवल्या जात आहेत. या चित्रपट (Movies), वेब सीरीजमध्ये अनेकदा उत्तर प्रदेशातील शहरांची नावेही येतात. चला तर मग जाणून घेऊया अशाच काही चित्रपटांबद्दल, ज्यांच्या नावांमध्ये उत्तर प्रदेशातील शहरांचीही नावे आहेत. (Films And Web Series Based On Uttar Pradesh Are Being Made On A large Scale)
बनारस - एक गूढ प्रेमकथा
2006 साली आलेला हा चित्रपट एकापेक्षा एक प्रसिद्ध स्टार्सने सजला होता. उर्मिला मातोंडकर (Urmila Matondkar), राज बब्बर, डिंपल कपाडिया, नसीरुद्दीन शाह या दिग्गजांनी या चित्रपटात काम केले. हा चित्रपट एका जातीच्या पेचात अडकलेल्या प्रेमकथेवर आधारित होता. बनारसच्या पार्श्वभूमीमुळे या शहराचे नाव देखील त्याच्या शीर्षकात दिले गेले. चित्रपटाला समीक्षकांची प्रशंसा मिळाली.
लखनऊ सेन्ट्रल
हा चित्रपट 2017 मध्ये आला होता. फरहान अख्तरच्या अभिनयाने चार चॉंद लावले. या चित्रपटाची कथा लखनऊच्या (Lucknow) सेंट्रल जेलभोवती विणली गेली आहे. फरहान अख्तर हा तुरुंगातील कैदी आहे, जो तुरुंगातील म्युझिक बँडचा भाग बनतो आणि नंतर त्याच्यावरचे आरोपही खोटे ठरतात. दीपक डोबरियाल, रोनित रॉय, डायना पेंटी या कलाकारांनीही फरहानसोबत या चित्रपटात काम केले आहे.
जिल्हा गाझियाबाद
दिल्लीला लागून असलेला उत्तर प्रदेशातील गाझियाबाद जिल्हा गुन्हेगारीसाठी प्रसिद्ध होता. 'जिल्हा गाजियाबाद' हा चित्रपटही याच विषयावर बनवण्यात आला होता. चित्रपटात दोन मोठ्या गटातील वैर दाखवण्यात आले आहे. अर्शद वारसी आणि विवेक ओबेरॉय गँगस्टरच्या भूमिकेत होते. त्याचवेळी संजय दत्तने एका दबंग पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारली होती.
बरेली की बर्फी
आयुष्मान खुराना, राजकुमार राव आणि क्रिती सेनॉन यांचा चित्रपट बरेली शहराच्या पार्श्वभूमीवर बेतलेला आहे. बिट्टी ( Kriti) एका मुलीची भूमिका करते. जी बरेलीसारख्या छोट्या शहरामध्ये खूप स्वतंत्र आहे. ती इंग्रजी चित्रपट पाहते, नृत्य करते आणि विशेष धूम्रपान देखील करते. एके दिवशी तिच्या हातात एक पुस्तक पडते. या पुस्तकाचे कथानक तिच्या पात्राच्या कथेशी मिळतेजुळते आहे. ती पुस्तकाच्या लेखकाचा शोध घेऊ लागते. चिराग ( Ayushman) ने हे पुस्तक लिहिले आहे, परंतु त्याने आपली ओळख लपवली आहे. आणि त्याने क्रितीला सांगितले आहे की, त्या पुस्तकाचा लेखक राजकुमार राव आहे. या गैरसमजुतींमध्येच ही कथा पुढे जाते.
मिर्झापूर
अॅमेझॉन प्राइमच्या या वेब सीरिजचे दोन सीझन आले आहेत, ज्यांना प्रेक्षकांनी खूप पसंती दिली आहे. उत्तर प्रदेशातील राजकारण आणि गुन्हेगारीवर आधारित या चित्रपटाची कथा आहे. चित्रपटातील मुख्य पात्र कालीन भैया ( Pankaj Tripathi) खूप लोकप्रिय झाले. दोन सामान्य मुलं गुन्हेगारीच्या दुनियेत कशी शिखरावर पोहोचतात हे या मालिकेत दाखवण्यात आले आहे. यासोबतच गुन्हेगारीच्या जगावर राज्य करणाऱ्या कुटुंबाची काळी कहाणीही त्याच्या कथानकाचा भाग आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.