Filmfare Awards Video
Filmfare Awards Video Twitter
मनोरंजन

Filmfare Awards Video: सिद्धू मूसेवालाच्या गाण्यावर थिरकले रणवीर अन् विकी कौशल

दैनिक गोमन्तक

Ranveer Singh Vicky Kaushal Dance: नुकत्याच झालेल्या 67व्या फिल्मफेअर अवॉर्ड्स (Filmfare Awards 2022) सोहळ्याचे सर्व व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यावेळी बॉलिवूड अभिनेता विकी कौशलला 'सरदार उधम'साठी फिल्मफेअरमध्ये बेस्ट एक्टर क्रिटिक पुरस्कार जाहीर झाला आहे.

रणवीर सिंगला '83'साठी फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा किताब मिळाला. दोन्ही कलाकार आपला आनंद मोठ्या उत्साहात साजरा करताना दिसले. फिल्मफेअरच्या मागील स्टेजवरून दोघांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ते दिवंगत पंजाबी गायक सिद्धू मूसवाला यांच्या गाण्यावर जबरदस्त डान्स करताना दिसले.

विकी कौशल-रणवीर सिंगचा डान्स

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये रणवीर सिंग आणि विकी कौशल सिद्धू मूसवालाच्या 'गब्रू' गाण्यावर जोरदार डान्स करताना दिसत आहेत. प्रत्येकजण त्यांच्या डान्सचा आनंद घेताना दिसत आहे. या ठिकाणी उपस्थित क्रिती सेनॉन आणि दीपिका पदुकोण देखील विकी कौशल आणि रणवीर सिंगच्या डान्सचा आनंद घेताना दिसत आहेत.

कृती सेननने 'मिमी'साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा किताब पटकावला आहे. फिल्मफेअर अवॉर्ड्सदरम्यान दीपिका पदुकोण रणवीर सिंगसाठी खूप उत्साहित दिसत होती, तर बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफही तिचा पती विकी कौशलला हा पुरस्कार स्वीकारताना पाहून खूप उत्साहित होती. लाल सूट-बूटमध्ये रणवीर सिंग खूपच डॅशिंग दिसत आहे. त्याचवेळी विकी कौशलही काळ्या रंगाच्या सूटमध्ये सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. रणवीर आणि विकी हे दोघेही बॉलिवूडमधील सर्वोत्तम अभिनेत्यांमध्ये गणले जातात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yellow Alert In Goa: गोव्यात पुढील सहा दिवस पावसाची शक्यता, दोन दिवसांसाठी 'यलो अलर्ट'

Donation: उल्‍हास वेर्लेकर कुटुंबियांकडून गोव्‍यातील दहा संस्‍थांना प्रत्‍येकी एक लाखाची देणगी

Brij Bhushan Sharan Singh: ब्रिजभूषण शरण सिंह यांना मोठा झटका; कोर्टाने लैंगिक छळाचे आरोप केले निश्चित

Valpoi Hegdewar High School: डॉ. हेडगेवार हायस्कूलला विश्वजीत राणेंकडून दोन कोटींची देणगी जाहीर

GI Tag For Goa's Urrak: मानकुराद, फेणी, बिबिंकानंतर आता हुर्राकला लवकरच मिळणार GI मानांकन

SCROLL FOR NEXT