Video: सलमान खानने व्हिडिओ शेअर करत चाहत्यांना दिले अर्पिताकडील बाप्पांचे दर्शन

Ganesh Chaturthi 2022: सलमान खान अर्पिता खानच्या घरी गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी गेला तेव्हा आरती करतानाचा व्हिडिओ सोशल मिडीयावर शेअर केला आहे.
Salman Khan |Video |Ganesh Chaturthi
Salman Khan |Video |Ganesh Chaturthi Dainik Gomantak
Published on
Updated on

दरवर्षी बॉलिवूड सेलिब्रिटी त्यांच्या घरी गणपती बाप्पाला थाटामाटात आणतात. बॉलिवूडमध्ये गणेश चतुर्थी जल्लोषात साजरी केली जाते. दरवर्षी त्यांच्या घरी गणपती बाप्पा आणणाऱ्यांमध्ये सलमान खानची बहीण अर्पिता खान देखील सामील आहे. दरवर्षी अर्पिता तिच्या घरी गणपतीची मूर्ती आणते आणि तिला पाहण्यासाठी अनेक सेलिब्रिटी येतात. बॉलिवूडचा (Bollywood) भाईजान सलमान खाननेही अर्पिताच्या घरी जाऊन गणपती बाप्पाचे दर्शन घेतले. गणेश चतुर्थीच्या या सेलिब्रेशनचा एक व्हिडिओ सलमान खानने सोशल मिडीयावर शेअर केला आहे.

दरवर्षीप्रमाणे गणेश चतुर्थीला सलमान खान (Salman Khan) अर्पिताच्या घरी गेला होता. त्याने गणेश चतुर्थीच्या पूजेचा व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तो आरती करताना दिसत आहे. व्हिडीओ शेअर करत सलमान खानने लिहिले - गणपती बाप्पा मोरया. व्हिडिओमध्ये (Video) सलमान पांढरा शर्ट आणि डेनिम्स जिन्समध्ये दिसत आहे. त्याचा हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये सलमानशिवाय रितेश देशमुख, अर्पिता आणि आयुष आरती करताना दिसत आहेत.

अनेक सेलेब्स अर्पिता आणि आयुषच्या घरी गणपती पूजेसाठी पोहोचले होते. कतरिना कैफ विकी कौशलसोबत पोहोचली होती तर रितेश देशमुख, जेनेलिया डिसूजा, सोहेल खानसह अनेक सेलिब्रिटी सहभागी झाले होते.

वर्क फ्रंटबद्दल बोलायचे तर सलमान खान लवकरच 'टायगर 3' मध्ये कतरिना कैफसोबत दिसणार आहे. याशिवाय तो 'किसी का भाई... किसी की जान'मध्ये पूजा हेगडेसोबत दिसणार आहे. हा चित्रपट अॅक्शन, रोमान्स आणि कॉमेडीने परिपूर्ण असणार आहे. नुकताच या चित्रपटातील त्याचा लूक समोर आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com