Farmani Naaz song screenshot
मनोरंजन

Farmani Naaz Story: कोण आहे फरमाणी नाझ? जिने गायलयं 'हर हर शंभू'

फरमाणी नाझने नुकतेच तिच्या यूट्यूब चॅनेलवर 'हर हर शंभू' नावाचे शिव भजन प्रसिद्ध केले.

दैनिक गोमन्तक

Farmani Naaz Har Har Shambhu Song: प्रसिद्ध सिंगिंग रिअॅलिटी शो इंडियन आयडल फेम आणि यूट्यूब गायक फरमानी नाझ सध्या चर्चेत आहे. खरं तर श्रावण महिन्यात , फरमानी नाझने नुकतेच तिच्या यूट्यूब चॅनेलवर 'हर हर शंभू' नावाचे शिव भजन प्रसिद्ध केले. या भजनानंतर चांगलाच वाद पेटला असून अनेक मौलानांनी या गायिकेविरोधात आवाज उठवला आहे.

फरमानी नाझ उत्तर प्रदेशातील मुझफ्फंजर जिल्ह्यातील मोहम्मदपूर माफी नावाच्या एका छोट्या गावातील रहिवासी आहे . त्याच वेळी, 2017 मध्ये, फरमानी नाजचा विवाह मेरठच्या छोट्या हसनपूर गावात राहणाऱ्या इमरानसोबत झाला. लग्नानंतर फरमानी नाजने जो विचार केला त्याच्या उलट झाले. तिला सासरच्यांकडून टोमणे आणि त्रास होऊ लागला. लग्नाच्या काही काळानंतर फरमानीला एक मुलगा झाला, त्याचे नाव मोहम्मद अर्श आहे.

या मुलाच्या जन्मानंतर फरमानी नाझच्या आयुष्यात संकटाचे ढग दाटून आले कारण अर्शला घशाचा आजार असल्याचे समोर आले. ज्यांच्या उपचारासाठी फरमानी नाजने पैशांची व्यवस्था करण्यासाठी रात्रंदिवस काम सुरू केले. अशा परिस्थितीत फरमानी नाझच्या पतीने तिला सोडून दुसरे लग्न केले. यानंतर फरमानी नाज मोहम्मदपूर येथील वडिलांच्या घरी परत राहायला आली.

संघर्षाच्या दिवसांत यूट्यूब स्टार

फरमानी नाझला गाण्याची खूप आवड आहे. एके दिवशी फरमाणी एक गाणे गुणगुणत होती, तेव्हा गावातील राहुल नावाच्या व्यक्तीने तिचे गाणे ऐकले आणि तिचे एक गाणे रेकॉर्ड करून ते यूट्यूबवर टाकले. यानंतर फरमानी नाझच्या गाण्याला काही चाहत्यांनी पसंत केले. आणि ते व्हायरल झाले. अशाप्रकारे फरमानी नाझने स्वतःचे यूट्यूब चॅनल सुरू केले, ज्याचे सुमारे 38.4 लाख सदस्य आहेत. फरमानी नाझ आणि फरमानची जोडी अधिक पसंत केली गेली. कारण फरमान हा तोच व्यक्ती आहे ज्याने फरमानीचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्याची जबाबदारी घेतली होती.

इंडियन आयडॉलमध्ये फरमानी नाझ

फरमानी नाझने टीव्हीच्या प्रसिद्ध सिंगिंग शो इंडियन आयडल सीझन 12 मध्ये एन्ट्री घेतली. यादरम्यान प्रसिद्ध गायिक नेहा कक्कर, हिमेश रेशमिया आणि विशाल ददलानी हे फरमाणी नाझचे चाहते बनले. यादरम्यान फरमाणी नाझने 'जो वादा किया तो निभाना पगागा' हे हिंदी गाणे गायले. यावेळी फरमानीसोबत फरमानही उपस्थित होता. मात्र, मुलगा अर्शची प्रकृती खालावल्याने फरमानीला इंडियन आयडॉलमधून परतावे लागले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rahul Gandhi: 'केवळ रस्त्यावर उतरुन सत्तापालट होत नाही', 'अच्छे दिन'च्या धर्तीवर 2029 साठी राहुल गांधींचा प्लॅन काय? 12 महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे देण्याचे आव्हान

CJP Protest: ‘सीजेपी’चे आंदोलक पोलिसांच्या रडारवर, 300 अज्ञातांविरोधात गुन्हा; धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप

Goa Assembly Election 2027: 'मी निवडणूक लढवणारच!', हडफडेचे माजी सरपंच रोशन रेडकरांनी ठोकला शड्डू; लोबोंसमोर आव्हान

खरी कुजबुज: मॅडमचा भलताच तोरा

Goa Medical College: ईएसआयसी मेडिकल कॉलेजमध्ये स्थानिकांना 50 टक्के राखीव जागा, राष्ट्रीय आरक्षण धोरणानुसार होणार भरती; गोमंतकीय विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा मार्ग सुकर

SCROLL FOR NEXT