Farhan AKhtar Bachelorette Party Insta /Farhan AKhtar
मनोरंजन

फरहान अख्तरने केली हटकेवाली बॅचलर पार्टी

बॉलिवूड अभिनेता आणि चित्रपट निर्माता फरहान अख्तर सध्या गर्लफ्रेंड शिबानी दांडेकरसोबतच्या लग्नामुळे चर्चेत आहे.

दैनिक गोमन्तक

Farhan Akhtar Shibani Dandekar Wedding: बॉलिवूड अभिनेता आणि चित्रपट निर्माता फरहान अख्तर सध्या गर्लफ्रेंड शिबानी दांडेकरसोबतच्या लग्नामुळे चर्चेत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, फरहान आणि शिबानी या महिन्यात लग्न करणार आहेत, ज्याची तयारीही सुरू झाली आहे. दरम्यान, आता फरहान अख्तरने अलीकडेच आपल्या मित्रांसोबत बॅचलर पार्टीचा (Farhan AKhtar Bachelorette Party) एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोंमध्ये फरहान अख्तर त्याच्या बॉईज गँगसोबत दिसत आहे.

फरहान अख्तरने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर हा फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, 'मुले शहरात परतली आहेत. हॅशटॅग स्टेज डे नाइट फीवर.' या फोटोमध्ये रितेश सिधवानी आणि शकील लडकसह फरहानचे अनेक जवळचे मित्र एकत्र पोज देताना दिसत आहेत.

इतकंच नाही तर फरहान अख्तरची गर्लफ्रेंड शिबानी दांडेकरही पार्टीत हजर होती. मात्र, या पार्टीला तिनी अनोख्या पद्धतीने हजेरी लावली. वास्तविक, समोर आलेल्या फोटोमध्ये फरहान अख्तरची मैत्रीण शिबानी दांडेकर आणि फरहान चेहऱ्यावर मास्क घातलेले दिसत होते. हाच मास्क फरहानच्या व्हॅलेंटाईन डेच्या पोस्टवरही दिसला होता.

फरहान अख्तरच्या बॅचलर पार्टीच्या या फोटोवर शिबानी दांडेकरनेही कमेंट केली आहे. या फोटोवर कमेंट करत आणि शिबानीने फेस मास्ककडे बोट दाखवत कमेंटमध्ये टेक्निकली मीही तिथे आहे, असे लिहिले.

विशेष म्हणजे फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. फरहान अख्तरचे वडील जावेद अख्तर यांनी नुकत्याच दिलेल्या माहितीनुसार, दोघेही 21 फेब्रुवारीला मुंबईत कोर्ट मॅरेज करणार आहेत. जावेद अख्तर यांनी असेही सांगितले होते की, महामारीची परिस्थिती पाहता केवळ जवळचे मित्र आणि कुटुंबातील सदस्यच लग्न समारंभाला उपस्थित राहतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT