गोल्डन मॅन बप्पी लहिरींना आवडला नव्हता राजकुमार साहेबांचा जोक

एकेकाळी या गोल्डन मॅनची बॉलिवूड अभिनेता राज कुमार यांनी खिल्ली उडवली होती.
Golden Man Bappi Lahiri Raajkumar
Golden Man Bappi Lahiri RaajkumarDainik Gomantak
Published on
Updated on

बॉलिवूडला अनेक अविस्मरणीय गाणी देणारे संगीतकार आणि गायक बप्पी लहिरी (Bappi Lahiri dies) यांचे निधन झाले. लता मंगेशकर यांच्या निधनानंतर काही दिवसांनी बॉलिवूडने आणखी एक दुर्मिळ हिरा गमावला आहे. आज सकाळी मुंबईतील रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बप्पी लहिरी यांच्या निधनानंतर बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली आहे. बप्पी दा इंडस्ट्रीत 'गोल्ड मॅन' या नावाने प्रसिद्ध होते. ते सोन्याच्या दागिन्यांच्या किती प्रेमात होते हे सर्वांनाच माहीत आहे. पण एकेकाळी या गोल्डन मॅनची बॉलिवूड अभिनेता राज कुमार यांनी खिल्ली उडवली होती.

बप्पी लाहिरी-राज कुमार एका पार्टीत भेटले होते

बप्पी लहिरी (Bappi Lahiri) शांत स्वभावाचे होते. सुपरस्टार राज कुमारसोबत त्यांची पहिली भेट एका पार्टीदरम्यान झाली होती. बप्पी लाहिरी यांना दागिन्यांची आवड होती, त्यामुळे या पार्टीतही ते दागिने घालून पोहोचले.

Golden Man Bappi Lahiri Raajkumar
संगीतकार-गायक बप्पी लहिरी काळाच्या पडद्याआड

फक्त मंगळसूत्राची कमतरता

मीडिया रिपोर्ट्सनुसार, बप्पी दा यांच्या अंगावर भरपुर दागिने होते. ते पाहून राज कुमार यांनी त्यांची खिल्ली उडवली. "फॅन्टॅस्टिक, तुम्ही एकसे बढकर एक दागिने घातले आहेत, फक्त यात मंगळसूत्राची कमी आहे, ते घातले तर आणखी छान दिसले असते," असे म्हणत त्यांनी पार्टिमध्ये बप्पी दा ची खिल्ली उडवली होती.

बप्पी दा यांना आवडला नव्हता जोक

बप्पी लहिरी राज कुमार साहेबांच्या हा जोक त्यांना आवडला नाही. त्यांनी या प्रकरणाला विनोद म्हणून घेतले आणि पार्टीचे वातावरण खराब न करता त्यांनी हे प्रकरण न वाढवता शांत राहिले.

बप्पी दाचे खरे नाव

बप्पी दा या नावाने प्रसिद्ध असलेले आलोकेश लहिरी हे अवघ्या 69 वर्षांचे होते. त्यांनी भारतीय चित्रपटात संश्लेषित डिस्को संगीताला लोकप्रिय केले. आजही अनेक संगीतप्रेमी बप्पी दांच्या गाण्यावर थिरकरतात.

Golden Man Bappi Lahiri Raajkumar
बप्पी लाहिरी इतके सोने का घालायचे?

बंगाली ब्राह्मण कुटुंबात झाला जन्म

बप्पी लाहिरी यांनी 1980 च्या दशकात आपल्या संगीत आणि गाण्यांद्वारे लोकांच्या हृदयात आपले नाव कोरले. डिस्को डान्सर, शराबी आणि नमक हलाल सारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये गाणी गायली. बप्पी लाहिरी यांचा जन्म 27 नोव्हेंबर 1952 रोजी पश्चिम बंगालमधील जलपाईगुडी येथे झाला. ते बंगाली ब्राह्मण कुटुंबातील होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com