Fans pour milk on the poster of Salman Khan's film Antim
Fans pour milk on the poster of Salman Khan's film Antim Dainik Gomantak
मनोरंजन

फटाके फोडल्यानंतर सलमान खानच्या चाहत्यांनी चित्रपटाच्या पोस्टरवर दूध केले अर्पण

दैनिक गोमन्तक

बॉलीवूडचा (Bollywood) सुपरस्टार सलमान खानचा (Salman Khan) 'अंतिम' (Anitm) या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दणका दिला आहे. या चित्रपटाबद्दल चाहते खूप उत्सुक दिसत आहेत. बऱ्याच काळानंतर सलमान खान मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. अशा परिस्थितीत त्याच्या चाहत्यांना त्यांच्या उत्साहावर नियंत्रण ठेवता येत नाही.

सलमान खानने नुकताच इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये त्याचे चाहते अंतिमच्या पोस्टरवर दूध ओतताना दिसत आहेत. सलमान खानने त्याच्या चाहत्यांना असे न करण्याचे आवाहन केले आहे. सर्वांना विनंती करताना सलमानने असे दूध वाया घालवू नका असे म्हटले आहे.

हा व्हिडिओ पोस्ट करताना सलमान खानने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, अनेकांना पाणीही मिळत नाही, अशा परिस्थितीत तुम्ही दूध वाया घालवत आहात. जर तुम्हाला दूध द्यायचेच असेल तर मी सर्व चाहत्यांना विनंती करतो की तुम्ही ते गरीब मुलांना द्या. ज्यांना प्यायला दूध मिळत नाही. हे ऐकल्यानंतर सोशल मीडियावर सर्व चाहते सलमान खानचे जोरदार कौतुक करताना दिसत आहेत. एका यूजरने लिहिले - भाऊ तुम्ही खरोखर खूप चांगले व्यक्ती आहात.

26 नोव्हेंबरला सलमानचा चित्रपट अखेर देशभरातील सर्व चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटात सलमान खानसोबत त्याचा मेव्हणा आयुष शर्मा दिसत आहे. सलमान खान आणि आयुष शर्मा यांची जोडी पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. या चित्रपटाद्वारे टीव्ही अभिनेत्री महिमा मकवाना हिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे.

सलमान खान अंतिम या चित्रपटात सरदार पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसत आहे. त्याचबरोबर या चित्रपटात आयुष शर्मा एका गँगस्टरच्या भूमिकेत दिसत आहे. महेश मांजरेकर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vegetable Prices Update: राज्यात फळभाज्यांचे दर भडकले, लसूण 320 रुपये किलो; सर्वसामान्यांना महागाईचे चटके

Blue Origin Flight: ऐतिहासिक! राकेश शर्मानंतर गोपीचंद थोटाकुरा ठरले अंतराळात जाणारे दुसरे भारतीय

Holy Spirit Feast In Margao: होली स्पिरिट चर्चच्या फेस्ताची सुरवात; मडगाव पालिकेचे 35 लाख महसुलाचे लक्ष्य

Egg Prices Increased: गोव्यात मासळीपाठोपाठ आता बॉयलर अंड्यांचे भाव गगनाला भिडले; दरातील चढउतार सुरूच

Kushavati River: केपेतील ‘कुशावती’चे पाणी प्रदूषित; ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात!

SCROLL FOR NEXT