Kannada Actor Nithin Gopi Died Dainik Gomantak
मनोरंजन

Nithin Gopi Died: प्रसिद्ध कन्नड अभिनेत्याचे निधन, 39 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

नितीन यांच्या निधनामुळे कन्नड चित्रपटसृष्टीचे मोठे नुकसान झाले आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Kannada Actor Nithin Gopi Died: कन्नड चित्रपटसृष्टीतून एक हृदयद्रावक बातमी समोर आली आहे. कन्नड सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते नितीन गोपी यांचे 39 व्या वर्षी निधन झाले आहे. गोपी यांचे शुक्रवारी (2 जून) सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

नितीन यांच्या आकस्मिक निधनाने त्यांच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. गोपी यांचे चाहतेही जड अंतःकरणाने त्यांना अखेरचा निरोप देत आहेत.

नितीन गोपी हे बंगळुरू येथील त्यांच्या घरी असताना त्यांच्या अचानक छातीत दुखू लागले. प्रकृती खालावल्याने अभिनेत्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र हॉस्पिटलमध्येच त्यांचे निधन झाले. गोपी यांनी 39 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. डॉक्टरांनी घेतलेल्या अथक प्रयत्नानंतर देखील नितीन यांना वाचवता आले नाही.

नितीन गोपी हे कन्नड चित्रपट आणि टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेते होते. हॅलो डॅडी या चित्रपटातील त्याच्या व्यक्तिरेखेचे ​​आणि अभिनयाचे खूप कौतुक झाले. याशिवाय नितीन केरलिदा केसरी, मुत्थिनंत हेंडती, निशब्धा यांसारख्या चित्रपटांमध्येही काम केले आहे.

पुर्नविवाह या लोकप्रिय मालिकेतही नितीनने महत्त्वाची भूमिका साकारली होती. त्याचा शो हिट झाला होता.

नितीनने चित्रपटांव्यतिरिक्त टीव्हीवरही बरेच काम केले आहे. हर हर महादेव या मालिकेच्या काही भागांमध्ये अभिनेत्याने कॅमिओ केला आहे. याशिवाय त्यांनी अनेक तमिळ शोमध्येही काम केले आहे. नितीनच्या दिग्दर्शनाबाबतही अनेक योजना होत्या. मात्र त्यांच्या आकस्मिक निधनाने संपूर्ण कन्नड उद्योगाला मोठा धक्का बसला आहे. नितीन यांच्या निधनामुळे कन्नड चित्रपटसृष्टीचे मोठे नुकसान झाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Diwali Bonus for Central Govt Employees: केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीची मोठी भेट! मोदी सरकारकडून बोनस जाहीर; खात्यात येणार 'इतके' पैसे

Crime News: आधी प्रेमसंबंध, नंतर हत्येचा कट! पत्नीने पतीच्या मदतीने प्रियकराचा गळा आवळला; मृतदेह गोणीत भरून कालव्यात फेकला

Triple Talaq Case: लग्नानंतर 21 वर्षे संसार, 3 मुलं आणि आता...! बायकोला ट्रिपल तलाक देणाऱ्या नवऱ्याला कोर्टाचा दणका; सुनावली 'इतक्या' वर्षांची शिक्षा अन् दंड

VIDEO: 'सर्वात मोठे ओठ' बनवण्याचा अट्टहास! डॉक्टरांनी नकार दिल्यावर महिलेने घरीच घेतलं इंजेक्शन; पुढे नको तेच झालं, पाहा व्हिडिओ

Bulbul Film Festival: बुलबुल बालचित्रपट महोत्सवाची सांगता; 'द ग्रेट ग्रॅंड सुपर हिरो'चे प्रदर्शन, सर्वोत्तम चित्रपटाची घोषणा

SCROLL FOR NEXT