Arjun Kapoor

 
Dainik Gomantak
मनोरंजन

अर्जुन कपूर कोरोना पॉझिटिव्ह, मलायकाचीही होणार चाचणी

अर्जुनची कोरोनाशी ही दुसरी लढाई आहे. गेल्या वर्षी सप्टेंबर 2020 मध्ये त्यालाही कोरोना पॉझिटिव्ह आला होता

दैनिक गोमन्तक

कोरोनाचा संसर्ग बॉलिवूडपर्यंत पोहोचला आहे. बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर आणि त्याची बहीण अंशुला कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर दोघांनाही क्वारंटाईन करण्यात आले असून त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांना त्यांनी चाचणी करण्याचे आवाहन केले आहे. अर्जुन कपूर नुकताच त्याची गर्लफ्रेंड मलायका अरोराच्या (Malaika Arora) घरी ख्रिसमस (Christmas) पार्टी साजरी करण्यासाठी गेला होता.

या पार्टीत मलायकाची बहीण अमृता अरोराही सहभागी झाली होती. मलायका व्यतिरिक्त, तिच्या BFF करिश्मा कपूरच्या घरी देखील ख्रिसमस पार्टीचे शानदार सेलिब्रेशन होते. या पार्टीत अर्जुन आणि मलायका एकत्र दिसले होते. करीना आणि अमृता या दोन्ही सेलिब्रिटी ख्रिसमसच्या काही दिवस आधी कोरोना निगेटिव्ह आल्या होत्या.

दुसरीकडे, रिया कपूर आणि करण बुलानी देखील कोरोनाच्या (Corona) विळख्यात आले आहेत. जेव्हा करीना आणि अमृता कोरोना पॉझिटिव्ह असल्याची बातमी आली तेव्हा रिया कपूरचे नावही चर्चेत आले होते. रियाने तिच्या घरी गेट-टूगेदर पार्टी ठेवली होती, त्यानंतर सेलिब्रिटींना कोरोनाची लागण झाली. त्यावेळी रियाची चाचणी झाली आणि ती निगेटिव्ह आली. खबरदारी म्हणून मलायकाने तिची चाचणीही करून घेतली. अर्जुन कपूर (Arjun Kapoor) दुसऱ्यांदा कोरोना पॉझिटिव्ह आला आहे, अर्जुनची कोरोनाशी ही दुसरी लढाई आहे. गेल्या वर्षी सप्टेंबर 2020 मध्ये त्यालाही कोरोना पॉझिटिव्ह आला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Iran Drone Threat: ऑस्कर 2026 वर इराणच्या ड्रोन हल्ल्याचे सावट, सोहळ्यापूर्वीच एफबीआयचा हाय-अलर्ट; सुरक्षा पथके 'ऑन मोड'

जयशंकर यांचा एक 'कॉल' अन् इराणचा 'ग्रीन सिग्नल'! भारतीय जहाजांसाठी होर्मुजचा मार्ग मोकळा; इराणकडून भारताल विशेष सवलत

गोव्यातील नद्यांना मिळणार 'संजीवनी'! नाल्‍यांच्‍या पाण्‍याचीही होणार चाचणी, दोन्ही जिल्ह्यात स्वतंत्र लॅब उभारणार; मंत्री शिरोडकर यांची घोषणा

Middle East War: युद्ध थांबवण्यासाठी इराणचा 'मास्टर प्लॅन'! राष्ट्राध्यक्ष पेजेशकियन यांनी आखली लक्ष्मणरेषा; ठेवल्या 'या' 3 अटी

Hardik Pandya Complaint: टी-20 वर्ल्ड कप विजयाचा आनंद ठरला 'वादग्रस्त'! हार्दिक पांड्याच्या 'त्या' सेलिब्रेशनवरुन पुण्यात तक्रार दाखल; काय नेमकं प्रकरण? VIDEO

SCROLL FOR NEXT