Ekta Kapoor Dainik Gomantak
मनोरंजन

Ekta Kapoor ने 'टेलिव्हिजन क्वीन' म्हणून मिळवली मनोरंजन विश्वात ओळख

Happy Birthday Ekta Kapoor: एकता कपूर आपल्या वयाच्या 15व्या वर्षी करिअरची सुरुवात केली.

दैनिक गोमन्तक

बाॅलिडमधील प्रसिद्ध अभिनेते जितेंद्र आणि शोभा कपूर यांची मुलगी एकता कपूर (Ekta Kapoor) आज टेलिव्हिजन इंडस्ट्री आणि ओटीटीवर राज्य करत आहे. निर्माती आणि दिग्दर्शिका असणारी एकता कपूर, मनोरंजन क्षेत्रात 'टेलिव्हिजन क्वीन' म्हणून प्रसिद्ध आहे. एकता कपूर आज आपला 47वा वाढदिवस साजरा करत आहे. केवळ टीव्ही क्षेत्रातच नाही, तर बॉलिवूडमध्येही तिने आपल्या कामाने खास ओळख निर्माण केली आहे. (Happy Birthday Ekta Kapoor News)

एकता कपूर ही ज्येष्ठ चित्रपट (Movie) जितेंद्र आणि शोभा कपूर यांची मुलगी आहे. एकताचा जन्म 7 जून 1975 रोजी झाला. तिचा धाकटा भाऊ तुषार कपूर बाॅलिवुडमधील एक प्रसिद्ध अभिनेता आहे. एकताने वयाच्या 15व्या वर्षी कैलाश सुरेंद्रनाथ यांच्या जाहिरात आणि चित्रपट निर्मिती कंपनीत काम करण्यास सुरुवात केली होती. इथूनच तिने तिच्या करिअरची सुरुवात केली.

* 'बालाजी टेलिफिल्म्स’ ची सुरुवात

पहिल्या अपयशानंतर, एकताने तिच्या वडिलांच्या सल्ल्यानुसार स्वतंत्र्य निर्माती बनण्याचा निर्णय घेतला. यानंतर एकताने 1994 मध्ये वडिलांच्या मदतीने ‘बालाजी टेलिफिल्म्स’ची सुरुवात केली. अनेक संघर्षानंतर एकताच्या मेहनतीला फळ मिळाले. 1995मध्ये बालाजी टेलिफिल्म्सच्या बॅनरखाली एकताची पहिली मालिका 'पडोसन' तयार झाली. ‘पडोसन’ ही एक विनोदी मालिका होती, जी दूरदर्शनवर प्रसारित झाली होती. त्याच वर्षी एकताच्या आणखी तीन मालिका प्रदर्शित झाल्या, त्यात 'हम पांच' ही प्रसिद्ध मालिका होती. या मालिकेमुळे एकताला एक यशस्वी आणि चांगली निर्माती म्हणून एकताला ओळख मिळाली. यानंतर तिने बालाजी टेलिफिल्म बॅनरखाली 130हून अधिक डेली सोप तयार केल्या आहेत.

‘अशी’ बनली टेलिव्हिजन क्वीन!

2000 मध्ये एकताने अनेक टेलिव्हिजन मालिकांची निर्मिती केली, ज्या प्रत्येक घराघरात प्रसिद्ध झाल्या. या काळात एकताने टेलिव्हिजन विश्वावर राज्य करण्यास सुरुवात केली. तिने निर्मित केलेल्या 'घर एक मंदिर' आणि 'क्यूंकी सांस भी कभी बहू थी' या मालिकां अजुनही लोकांच्या स्मरणात आहेत. एकता टेलिव्हिजन क्वीन बनली. एकताच्या प्रसिद्ध मालिकांमध्ये ‘कुटुंब’, ‘कसौटी जिंदगी की’, ‘कसम से’, ‘पवित्र रिश्ता’, ‘बडे अच्छे लगते हैं’, ‘कुमकुम भाग्य’ इत्यादी मालिकांचा समावेश आहे.

2001मध्ये, एकताने 'क्यूंकी में झुठ नहीं बोलता' या चित्रपटाद्वारे बॉलिवूड क्षेत्रात एन्ट्री केली. यानंतर एकताने बॉलिवूडमध्ये अनेक सुपरहिट चित्रपट दिले ज्यात ‘कुछ तो है’, ‘लव्ह सेक्स और धोका’, ‘वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई’, ‘शोर इन द सिटी’, ‘द डर्टी पिक्चर’, ‘लुटेरा’, ‘उडता पंजाब’, ‘ड्रीम गर्ल’ यासारख्या चित्रपटाचा समावेश आहे. यानंतर एकताने तिचा नवा ओटीटी प्लॅटफॉर्म ‘Alt Balaji’ सुरु केला. मालिका आणि चित्रपटांव्यतिरिक्त, एकताने अनेक वेब सीरीज (Web Series) देखील तयार केल्या आहेत. एकता कपूर केवळ टेलिव्हिजनवरचे नाही, तर चित्रपट जगतात एक मोठे नाव आहे. मनोरंजन विश्वातील महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल भारत सरकारने एकताला 2020 मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vidhu Vinod Chopra At IFFI: 'माझ्या सिनेमाच्या पहिल्या 'शो'ला चार-पाचच प्रेक्षक होते..'; चोप्रांनी सांगिलता 'खामोश'चा दिलखुलास किस्सा

Paroda Murder Case: पारोड्यात महिलेचा अज्ञाताकडून खून! संशयित कामगाराचा शोध सुरू

एकाच दिवशी Cash For Job मधील ठकसेनांना जामीन! तक्रारदारांची मात्र चिंता संपेना

Cash For Job प्रकरणातील तक्रारदारांचे मोबाईल जप्त केल्‍याचा दावा; संशयितांचे कॉल डिटेल्स, लोकेशन्‍स जाहीर करण्याचे मुख्यमंत्र्यांना आव्हान

Anjuna Villagers Protest: हणजुणेत स्थानिक आक्रमक! मेगा इव्हेंट्सविरोधात धरणे आंदोलन; ध्वनी प्रदूषणाविरोधी झळकावले फलक

SCROLL FOR NEXT