Jug Jug Jeeyo New Song: वरुण धवन आणि कियारा आडवाणीचा रोमॅंटिक अंदाजात पाहिलांत?

Jug Jug Jeeyo New Song Rangisari Video: 'जुग जुग जिओ' चित्रपटातील 'रंगसारी' हे दुसरं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे.
Rangisari Video
Rangisari VideoDainik Gomantak

बॉलिवूड अभिनेता वरुण धवन (Varun Dhawan), कियारा आडवाणी (Kiara Advani), नीतू कपूर (Neetu Kapoor) आणि अनिल कपूरच्या (Anil Kapoor) 'जुग जुग जिओ' (Jug Jugg Jeeyo) या चित्रपटाची प्रेक्षक प्रतीक्षा करत आहेत. चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. आता सिनेमातील 'रंगसारी' (Rangisari) हे गाणं रिलीज झालं आहे. या गाण्यात वरुण धवन आणि कियारा आडवाणी रोमॅंटिक अंदाजात दिसत आहेत. या गाण्याला तीन लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

'रंगसारी'मध्ये वरुण-कियाराचा रोमॅंटिक अंदाज

वरुण धवन (Varun Dhawan), आणि कियारा अडवाणीने (Kiara Advani) अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. आता 'जुग जुग जिओ' या चित्रपटाच्या माध्यमातून ते रुपेरी पडद्यावर झळकणार आहेत. 'जुग जुग जिओ' चित्रपटातील 'रंगसारी' गाणं चाहत्यांच्या पसंतीस उतरले आहे. कनिष्क सेठ आणि कविता सेठने हे गाणं गायले आहे. चित्रपटांमध्ये वरुण आणि कियारा पती-पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहेत.

'नाच पंजाबन' गाण्याने घातली सोशल मिडीयावर धुमाकूळ

'जुग जुग जिओ' चित्रपटातील (Movie) 'रंगसारी' हे दुसरे गाणं आहे. याआधी 'नाच पंजाबन' हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं होतं. अवघ्या काही दिवसांतच हे गाणं सुपरहिट झालं होतं. या चित्रपटात वरुण धवन, कियारा आडवाणी, अनिल कपूर, नीतू कपूर व्यतिरिक्त यूट्यूबर प्राजक्ता कोळी आणि मनीष पॉलदेखील दिसून येणार आहेत. करण जोहर प्रोडक्शनच्या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. तर राज मेहता यांनी या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे.

Rangisari Video
Salman Khan: धमकीचं पत्र मिळाल्यानंतर भाईजानच्या सुरक्षेत वाढ

24 जूनला सिनेमा येणार प्रेक्षकांच्या भेटीला

कोरोनामुळे (Corona) या सिनेमाचे शूटिंग पुढे ढकलण्यात आले होते. शूटिंगदरम्यान चित्रपटामधील कलाकारांना कोरोनाची लागण झाली होती. आता हा चित्रपट 24 जून 2022 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नीतू कपूर आणि अनिल कपूर या चित्रपटाच्या माध्यमातून पहिल्यांदाच एकत्र काम करताना दिसणार आहेत. चित्रपटात असणाऱ्या तगड्या स्टारकास्टमुळे प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com