Disha Patani Dainik Gomantak
मनोरंजन

Disha Patani: मेमरी लॉसमुळे तब्बल 6 महिने दिशाला काही आठवत नव्हते

सलमान खानच्या चित्रपटाच्या शुटिंगवेळी झालेला अपघात; डोक्याला दुखापत झाल्याने गेली होती स्मरणशक्ती

गोमन्तक डिजिटल टीम

Disha Patani: बॉलीवूडची हॉट अभिनेत्री दिशा पाटनी ही एकदा काँक्रिटच्या छतावरून पडल्याने तिच्या डोक्याला दुखापत झाली होती. त्यामुळे चक्क सहा महिने तिची स्मरणशक्ती गेली होती. तिला विस्मरणाचा विकार जडला होता. नुकतेच एका मुलाखतीत दिशाने याबाबत माहिती दिली.

सलमान खानच्या 'भारत' या चित्रपटाच्या चित्रिकरणावेळी एका ट्रेनिंगमध्ये दिशा काँक्रीटच्या छतावरून पडली आणि त्यात तिच्या डोक्याला मार लागला. त्यामुळे सहा महिने तिची स्मरणशक्ती गेली. फ्लिप मारताना ती डोक्यावर पडली होती. पण, या सहा महिन्यात तिला विस्मरणामुळे त्रास झाला.

अभिनेत्री दिशा पाटनी जेव्हा अभिनेता टायगर श्रॉफसोबत रिलेशनशिपमध्ये होती तेव्हा ती बरीच चर्चेत असायची. तथापि, गेल्या काही काळात दोघांनी ब्रेकअप केल्याने दिशादेखील लाईमलाईटमधून बाजूला पडली आहे. शिवाय तिचा अलीकडेच येऊन गेलेला 'एक व्हिलन रिटर्न' देखील फारसा चालला नाही. त्यामुळेही तिची फारशी चर्चा नाही. तथापि, सोशल मीडियात मात्र दिशा चांगलीच सक्रीय असते. तिचे वर्कआऊटचे व्हिडिओज ती नेहमी शेअऱ करत असते. शिवाय एक्स बॉयफ्रेंड टायगरी बहिण कृष्णा श्रॉफशी तिची चांगली मैत्री आहे. दोघी बऱ्याचदा एकत्र असतात. आणि एकत्रित फोटोज, व्हिडिओज शेअरही करत असतात.

दिशा फिटनेसबाबत खुप सतर्क आहे. ती तासनतास जिममध्ये घाम गाळते. तिला जिम्नॅशियमचीही आवड आहे. हे शिकताना काहीवेळा तुमची हाडे दुखाऊ शकतात, गुडघे फुटू शकतात, असेही ती म्हणते.

दरम्यान, आगामी काळात दिशा 'योद्धा' या चित्रपटात दिसणार आहे. याचित्रपटात तिच्यासमवेत सिद्धार्थ मल्होत्रा आणि राशी खन्ना हे देखील मुख्य भुमिकेत असणार आहेत. दिशाने 'एमएस धोनी : द अनटोल्ड स्टोरी' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News: धक्कादायक! अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी शिक्षकाविरुद्ध गुन्हा नोंद

Waste Management Projects: कुडचिरेवासियांच्या आंदोलनाला यश; प्रस्तावित बांधकाम कचरा निर्मूलन प्रक्रिया प्रकल्प होणार रद्द!

Goa Crime: दिवसाढवळ्या अपहरणाचा थरार! व्यवसायिकाला लुटण्याच्या मनसुब्यावर स्थानिकांनी फिरवले पाणी

Kala Academy: चूक मान्य करा, कामाला लागा!

Goa Accident: गोव्यात नऊ महिन्यात 209 अपघात, तरीही 10 टक्क्यांची घट; 'हे' आहे मुख्‍य कारणं

SCROLL FOR NEXT