Varun Dhawan: वरूण धवनला आहे 'हा' आजार; कामातून बऱ्याचदा घ्यावा लागतो ब्रेक

या दुर्मिळ आजारात चक्कर येऊन शरीराचे संतुलन बिघडते
Varun Dhawan
Varun DhawanDainik Gomantak

Varun Dhawan: दाक्षिणात्य अभिनेत्री समंथा रूथ प्रभू ही मायोसायटिस या आजाराने ग्रस्त असल्याची माहिती आम्ही काही दिवसांपुर्वीच दिली होती. त्यानंतर आता बॉलीवुडमधील आणखी एका कलाकाराला असाच एक गंभीर आजार असल्याचे समोर आले आहे. तो कलाकार म्हणजे अभिनेता वरूण धवन.

Varun Dhawan
ShahRukh Khan's Movie Jawan: शाहरूखच्या आगामी 'जवान' चित्रपटावर कथाचोरीचा आरोप

वरूण धवन याचा 'भेडिया' हा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज आहे. त्यातच वरूणच्या खासगी आयुष्यातील एक महत्वाची गोष्ट समोर आली आहे. ती म्हणजे, वरूणला एक दुर्मिळ आजार आहे. आणि या आजारामुळे त्याला बऱ्याचदा चित्रिकरणावेळी कामातून ब्रेक घ्यावा लागतो.

इंडिया टुडे कॉनक्लेव्हमध्ये वरूणने ही माहिती दिली. वरूणने सांगितले की त्याला वेस्टीबुलर हायपोफंक्शन (Vestibular Hypofunction) नावाचा आजार आहे.

वरूणने सांगितले की, कोरोनानंतर आयुष्य बदलेल असे वाटत असतानाच आता आपण पुन्हा त्या स्पर्धेत परत आलो आहोत. किती लोक सांगू शकतात की ते बदलले आहेत? लोक पुर्वीपेक्षा जास्त मेहनत करत आहेत. मला असे वाटत होते की, 'जुग जुग जियो' चित्रपटावेळी मी काम करत नाहीय तर अखंड धावतोय. कारण मी खुप तणावात होतो.

Varun Dhawan
The Kerala Story चित्रपटात 32 हजार महिलांचे जबरदस्तीने धर्मांतर, चित्रपटावरून वाद पेटला

वरूण म्हणाला की, मला माहिती नाही, मला काय झालेय. मी वेस्टीबुलर हायफोफंक्शनने त्रस्त आहे. यामुळे तुमचे संतुलन बिघडते. तुमच्याकडे काहीतरी उद्देश असला पाहिजे. तरच तुम्ही धावा. नाहीतर उगाच कशाच्याही मागे धावू नका. दरम्यान, आगामी काळात वरूण 'बवाल' या चित्रपटात जान्हवी कपुरसोबत दिसणार आहे.

काय आहे वेस्टीबुलर हायफोफंक्शन?

हा आजार म्हणजे एक डिसऑर्डर आहे. यात कानातील संतुलन बिघडते आणि कान नीट काम करत नाही. वेस्टिबुलर सिस्टिम कानात असते. आणि व्यक्तीचे संतुलन कायम ठेवण्यासाठी तसेच डोळे आणि स्नायूंसाठी ते महत्वाचे कार्य पार पाडते. जेव्हा ही यंत्रणा बिघडते तेव्हा मेंदुला चुकिचे संदेश दिले जातात. त्यामुळे व्यक्ती अस्वस्थ होते आणि त्याला चक्कर येऊ लागते. त्याचे संतुलन जाते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com