Amitabh Bachchan Dainik Gomantak
मनोरंजन

एका 'नकारा'मुळे अमिताभ बच्चन यांचे झाले होते मोठे नुकसान

अमिताभ बच्चनच्या (Amitabh Bachchan) एका चित्रपटाला नकार दिल्याने सलीम आणि जावेद यांनी बिग बीसोबत कधीही काम न करण्याची घेतली होती शपथ .

दैनिक गोमन्तक

बॉलीवुडमध्ये (Bollywood) सलीम खान आणि जावेद अख्तर यांनी लिहिलेल्या चित्रपटामुळे अनेक अभिनेते सुपरस्टार बनले आहेत. या यादीत अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्या नावाचाही समावेश आहे. अमिताभ बच्चन यांनी अनेक मोठमोठ्या चित्रपटांमध्ये काम करून त्यांना हीट बनवले आहे. त्याचवेळी अमिताभच्या एका शब्दाने त्यांचे मोठे नुकसान झाले होते. अमिताभ बच्चन यांनी सलीम-जावेद (Salim–Javed) लिखित चित्रपटात (Movie) काम करण्यास नकार दिल्यानंतर ते रागावले आणि या जोडीने अमिताभ बच्चन यांच्यासोबत कधीही काम न करण्याची शपथ घेतली होती.

सलीम- जावेद यांनी अमिताभ बच्चन यांच्या 'नाही'चा उल्लेख त्यांच्या 'सलीम जावेद: द स्टोरी ऑफ हिंदी सिनेमाज ग्रेटेस्ट स्क्रीन रायटर' या पुस्तकात केला आहे.पुस्तकानुसार, सलीम- जावेद यांना 'मिस्टर इंडिया' (Mr. India) चित्रपटासाठी अनिल कपूरच्या आधी अमिताभ बच्चन यांना नायक म्हणून घ्यायचे होते. चित्रपटाची (Movie) स्टोरी ऐकून अमिताभ बच्चन यांनी काम करण्यास नकार दिला होता. अमिताभ यांना ही भूमिका आवडली नव्हती कारण त्यांना या चित्रपटामध्ये खूप वेला अदृश्य राहावे लागत होते. त्याचबरोबर अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचा आवाजाही प्रेक्षकांना आवडेल असा विश्वास सलीम - जावेद यांना होता.

अमिताभ बच्चन यांनी नकार देण्यामागचे कारण सांगितले होते की लोक त्यांचा अभिनय पाहण्यासाठी थिएटरमध्ये येतात आणि त्यांचा आवाज ऐकू येत नाहीत. अमिताभ बच्चन यांच्या या नकरामुळे सलीम खान-जावेद अख्तर यांना इतका राग आला की, दोघानीही आपण अमिताभसोबत कधीच काम करायचे नाही अशी शपथ घेतली. अमिताभ बच्चन यांनी 'मिस्टर इंडिया' हा चित्रपत्र न करण्यापूर्वी सलीम- जावेद लिखित "जंजीर", "दीवार", आणि शोले यासारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT