Drishyam Remake in Korean Dainik Gomantak
मनोरंजन

Drishyam Remake in Korean : चीन,इंडोनेशियानंंतर आता या भाषेत होणार दृश्चमचा रिमेक...

मोहनलाल आणि अजय देवगन यांच्या दर्जेदार अभिनयाने सुपरहिट ठरलेला दृश्यम आता या भाषेत येणार आहे.

Rahul sadolikar

'दृश्यम'च्या नावावर आणखी एका यशाची भर पडली आहे. आता अजय देवगणच्या चित्रपटाचा कोरियन रिमेक बनणार आहे. कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये याची घोषणा करण्यात आली. पॅनोरमा स्टुडिओ आणि अँथॉलॉजी स्टुडिओने या चित्रपटासाठी भागीदारी केली आहे. कोरियन भाषेत भारतीय चित्रपटाचा रिमेक होण्याची ही पहिलीच वेळ आहे. 

'दृश्यम' हा पहिला मल्याळम भाषेत २०१३ मध्ये बनला होता, ज्यामध्ये मोहनलाल मुख्य भूमिकेत होते. आतापर्यंत हे 7 भाषांमध्ये बनवले गेले आहे, त्यापैकी तीन परदेशी भाषांचाही समावेश आहे. आता तो 8व्यांदा कोरियन भाषेत बनवला जाणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आता 'दृश्यम' कोरियन भाषेत बनवण्यात येणार आहे . Panorama Studios-Anthology Studios ने कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये अधिकृत घोषणा केली आहे. कुमार मंगत पाठक यांच्या पॅनोरमा स्टुडिओ आणि अँथॉलॉजीने कोरियामधील दृष्यम फ्रँचायझीचा रीमेक करण्यासाठी भागीदारीची घोषणा केली.

2015 मध्ये हिंदी रिमेक

दृश्यम २०१५ मध्ये हिंदीमध्ये आला होता. त्यात अजय देवगण, तब्बू, श्रिया सरन, इशिता दत्ता आणि ऋषभ चढ्ढा यांच्या महत्त्वाच्या भूमिका होत्या.हा चित्रपट निशिकांत कामत यांनी दिग्दर्शित केला होता, दुर्दैवाने निशिकांत कामत आता या जगात नाहीत. 

चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनबद्दल बोलायचे झाले तर, हा चित्रपट 38 कोटींमध्ये बनला होता आणि त्याने जगभरात 111 कोटींचा गल्ला जमवला होता. त्याचा दुसरा भाग 2022 मध्ये रिलीज झाला होता.

दृश्यमची सुरुवात मल्याळम भाषेपासुन

'दृश्यम' मल्याळम भाषेत 2013 मध्ये बनवण्यात आला होता. हा क्राइम-थ्रिलर चित्रपट जीतू जोसेफने लिहिला आणि दिग्दर्शित केला. मल्याळम सुपरस्टार मोहनलाल आणि मीना यांच्याशिवाय अंसीबा हासन, एस्थर अनिल, कलाभवन शाजॉन, आशा शरथ, सिद्दीकी, रोशन बसीर आणि नीरज माधव सहाय्यक भूमिकेत होते. 

आशीर्वाद सिनेमाजचे अँटोनी पेरुम्बावूर यांनी या चित्रपटाची निर्मिती केली होती. यानंतर 2021 मध्ये 'दृश्यम 2' चित्रपटाचा दुसरा भाग प्रदर्शित झाला.

इतर चार भारतीय भाषेतही आलाय दृश्यम

चित्रपटाच्या जबरदस्त यशानंतर 'दृश्यम' चित्रपटाचा अन्य चार भारतीय भाषांमध्ये रिमेक करण्यात आला आहे. हे कन्नडमध्ये दृश्यम (2014), तेलुगुमध्ये दृश्यम (2014), तमिळमध्ये पापनासम (2015) म्हणून आणि हिंदीमध्ये दृश्यम (2015) या नावानेच रिलीज झाले. सिंहली भाषेत (श्रीलंका) धर्मयुद्ध (2017) आणि नंतर चिनी भाषेत Sheep without a Shepherd (2019).

चीन, इंडोनेशिया नंतर आता कोरियन रिमेक

चीनमध्ये रिमेक झालेला हा पहिला भारतीय चित्रपट आहे. सप्टेंबर २०२१ मध्ये इंडोनेशियन रिमेकची घोषणा करण्यात आली. इंडोनेशियन भाषेत रिमेक केलेला हा पहिला भारतीय चित्रपट ठरला. कोरियन रिमेकची घोषणा मे 2023 मध्ये करण्यात आली आणि कोरियनमध्ये रिमेक होणारा हा पहिला भारतीय चित्रपट ठरला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

AUS vs BAN: क्रिकेटविश्वात मोठा उलटफेर! बांगलादेशनं बलाढ्य ऑस्ट्रेलियाला 9 विकेट्सनं लोळवलं, 30 मिनिटांत कांगारूंचा खेळ खल्लास Watch Video

Viral Video: मंदिरात दर्शन घेऊन बाहेर आला अन् गर्दीत चप्पल गायब! गोव्याच्या पठ्ठ्यानं थेट 'ChatGPT'ची घेतली मदत; काही क्षणांत... पाहा व्हायरल व्हिडिओ

राजकारणात खळबळ! पक्षाच्या कार्यालयात लटकलेल्या अवस्थेत आढळला नेत्याचा मृतदेह; सुसाइड नोटमध्ये लिहिलं, 'राजकारणात आलो, हीच मोठी चूक'

ICC ODI World Cup 2027: अखेर ठरलं! वनडे वर्ल्ड कपचा थरार 'या' तारखेपासून रंगणार; अंतिम सामन्याचीही तारीख निश्चित

Horoscope: रविवार ठरणार खास! वृषभ-कर्कसह 'या' राशींवर लक्ष्मीची कृपा, घरात सुख-समृद्धी अन् नोकरीत प्रमोशनचे संकेत

SCROLL FOR NEXT