Drishyam 2 Trailer Dainik Gomantak
मनोरंजन

Ajay Devgan च्या 'दृश्यम 2' चा ट्रेलर रिलीज, यावेळी काय खास! वाचा एका क्लिकवर

दैनिक गोमन्तक

दृश्यमच्या अफाट यशानंतर निर्मात्यांने 'दृश्यम 2' ची भेट चाहत्यांना दिली आहे. दृश्यममधील विजय साळगावकर यांना पाहण्यासाठी प्रेक्षकांची प्रतीक्षा संपणार आहे. खरंतर, चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे की आज 'दृश्यम 2' चा ट्रेलर रिलीज झाला आहे. 'दृश्यम 2' च्या ट्रेलरला रिलीज होताच सोशल मीडियावर (Social Media) जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे.

  • अजय देवगणने चित्रपटाच्या कथेची एक हिंट दिली आहे
    तर अजय देवगणने त्याच्या इन्स्टावर चित्रपटाचे (Movie) पोस्टर शेअर करताना कॅप्शनमध्ये कथेबद्दल एक हिंट देखील दिली आहे, त्याने लिहिले “सत्य हे एखाद्याच्या बीजासारखे असते. ते कितीही लपवण्याचा प्रयत्न केला करी एक दिवस बाहेर येईल." 

  • दृश्यम 2 चे पोस्टर देखील रिलीज
    याआधी शनिवारी अजयने त्याच्या इंस्टाग्राम हँडलवर 'दृश्यम 2' चे लेटेस्ट पोस्टर शेअर केले आहे. 'दृश्यम 2' चे पोस्टर शेअर करण्यासोबतच अजय देवगणने चाहत्यांना एक प्रश्नही विचारला. खरंतर अजयने या पोस्टरच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की- तुमच्या डोळ्यासमोर काय आहे हा प्रश्न नाही. प्रश्न असा आहे की तुम्ही काय पाहत आहात? दृश्यम प्रमाणे अजय देवगणचा हा प्रश्नही सस्पेन्सने भरलेला आहे. काही दिवसांपूर्वीच 'दृश्यम 2' चा जबरदस्त टीझर रिलीज झाला असल्याची माहिती आहे. 

' दृश्यम 2' कधी रिलीज होणार

अजय देवगणच्या 'दृश्यम 2' ची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. 'दृश्यम 2' च्या टीझरनंतर चित्रपटाच्या रिलीजची तारीख जाहीर करण्यात आली. अजय देवगण स्टारर 'दृश्यम 2' पुढील महिन्यात म्हणजेच 18 नोव्हेंबरला सिनेमागृहात दाखल होणार आहे. या चित्रपटात अजयसोबत अभिनेत्री तब्बू, श्रेया सरन आणि इशिता दत्ता मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दक्षिण गोव्यात Swiggy डिलिव्हरी बाईज् संपावर, काय आहेत प्रमुख मागण्या?

Goa Congress: दरमहा सात हजार! पगार की शिक्षा? शिक्षकांना देण्यासाठी भाजप सरकारकडे नाहीत पैसे; काँग्रेस

Goa Today's News Live: म्हापशात भेसळयुक्त 200 किलो बडीशेप जप्त

Pramod Sawant: दक्षिणेतील काही राज्य हिंदी समजून देखील घेण्याचा प्रयत्न करत नाहीत; गोवा मुख्यमंत्री

एक देश-एक निवडणूक! प्रत्यक्षात येण्याची वाट कमालीची खडतर; संपादकीय

SCROLL FOR NEXT