Dream Girl 2  Dainik Gomantak
मनोरंजन

Box Office Collection: अन् 'ड्रीम गर्ल'ने 'गदर 2' ला मागे टाकले ! जाणून घ्या काय सांगतात आकडे

Box Office Collection: मात्र, वीकेंडपर्यंत हा चित्रपट टिकला तर त्याच्या कमाईत थोडीशी वाढ होण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमन्तक

Box Office Collection: सनी देओल च्या गदर २ ने बॉक्स ऑफीसवर धुमाकूळ घातला होता. गदर २ ने कमाईच्या बाबतीत एक नवीन विक्रम रचला आहे. ड्रीम गर्ल २ ला देखील चांगले यश मिळाताना दिसले आहे. मात्र शाहरुख खानच्या जवान चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर या दोन्ही चित्रपटाच्या कमाईत घट होताना दिसून आली आहे.

आयुष्मान खुरानाच्या 'ड्रीम गर्ल 2' या चित्रपटाचीही अशीच परिस्थिती आहे. मात्र, गुरुवारी 'ड्रीम गर्ल 2' ची कमाई 'गदर 2' वरचढ ठरताना दिसत आहे.

मिळालेल्या माहीतीनुसार, अनिल शर्मा दिग्दर्शित 'गदर 2' चित्रपटाने गुरुवारी फारच कमी कमाई केली आहे. पाचव्या गुरुवारी म्हणजे 34 व्या दिवशी याने केवळ 50 लाख रुपयांची कमाई केली आहे. ही कमाई बुधवारइतकीच आहे. मात्र, वीकेंडपर्यंत हा चित्रपट टिकला तर त्याच्या कमाईत थोडीशी वाढ होण्याची शक्यता आहे.

आयुष्मान खुराना आणि अनन्या पांडे यांच्या 'ड्रीम गर्ल 2'नेही बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. या चित्रपटाने 100 कोटींहून अधिक कमाई केली आहे. तिसर्‍या गुरुवारी, 21 रोजी, चित्रपटाने सुमारे 59 लाखांची कमाई केली आहे, जी 'गदर 2' पेक्षा थोडी अधिक आहे.

सनी देओल आणि अमिषा पटेलच्या या चित्रपटाच्या 35 दिवसांच्या कमाईबद्दल बोलायचे झाले तर या चित्रपटाने जवळपास 677.60 कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटाने 34 दिवसांत 675.10 कोटींची कमाई केली आहे. तर ग्रॉस कलेक्शन 34 दिवसांत एकूण 609.60 कोटी रुपयांची कमाई केल्याचे म्हटले जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pro Kabaddi League Final 2025: दबंग दिल्ली पुन्हा कबड्डी 'चॅम्पियन'! जिंकला PKL 12चा किताब; फायनलमध्ये पुणेरी पलटनची कडवी झुंज अपयशी

Raigad Fort: मराठ्यांच्या शौर्याचा साक्षीदार, छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी; 'किल्ले रायगड'

Kuldeep Yadav Record: परदेशी मैदानांवर कुलदीपची 'जादू'! चहलला पछाडून बनला 'नंबर 1' भारतीय गोलंदाज; ऑस्ट्रेलियाविरुद्ध साधली किमया VIDEO

अर्ध्या तासाहून अधिक वाट पाहिली, रुग्णवाहिका वेळेवर न मिळाल्याने 46 वर्षीय वीज कर्मचाऱ्याचा मृत्यू; म्हापशातील धक्कादायक घटना

Goa Murder Case: पीर्ण येथे तरुणाचा खून? खुल्या पठारावर मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ

SCROLL FOR NEXT