CID Reunion: अनेक वर्षानंतर CID ची टीम पून्हा एकत्र! पोस्ट करत म्हटलं 'हे' करणं गरजेचे

CID Reunion: इतक्या वर्षांच्या मैत्रीमध्ये अनेक आनंदाचे, दु:खाचे अनेक क्षण सोबत जगलो आहोत.
CID
CIDDainik Gomantak

CID: टीव्हीवरील काही कार्यक्रम आपल्या नेहमी लक्षात राहतात. त्यातील कलाकारांचे आपल्या मनात खास स्थान असते.

सीआयडी ( CID ) हा त्यापैकी एक कार्यक्रम आहे. ज्याचे संपूर्ण भारतात मोठ्या संख्येने चाहते दिसून येतात.

अनेक वर्षे सातत्याने या मालिकेने प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. दया, अभिजित, एसीपी प्रद्युम्न, श्रेया, डॉक्टर तारिका, डॉक्टर साळुंखे ही पात्रांनी प्रेक्षकांच्या मनात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे.

आता यातील काही कलाकरांनी पून्हा एकदा एकत्र येत आठवणींना उजाळा दिला आहे. श्रेयाच्या भूमिकेत दिसणारी अभनेत्री जान्हवीने आपल्या सोशल मिडियावर ग्रुपसोबत फोटो शेअर केले आहेत. हे वेडेपण गरजेचे होते.

इतक्या वर्षांच्या मैत्रीमध्ये अनेक आनंदाचे, दु:खाचे अनेक क्षण सोबत जगलो आहोत. जसजसे आम्ही मोठे होत आहोत, तसतशी आमची मैत्रीदेखील मजबूत होत आहे, अशा आशयाचे जान्हवीने या फोटोंना कॅप्शन दिले आहे.

श्रद्धा मुसले, ऋषिकेश पांडे, अंशा सैयद, अजय नागराथ , जान्हवी यांना एकत्र पाहून चाहत्यांना दया, अभिजित आणि प्रद्युम्न या भूमिकेत दिसणाऱ्या कलाकारांची आठवण आली आहे.

सोशल मिडियावर या फोटोंवर नेटकरी प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. एक युजर म्हणतो, तुम्हा सगळ्यांना पून्हा एकदा एकत्र बघून आनंद झाला.

तर दुसऱ्या एका युजरने म्हटले आहे की, तुमच्याबरोबर दया, अभिजित आणि प्रद्युम्न हे देखील असायला हवे होते. तर आणखी एका युजरने म्हटले आहे की, पून्हा एकदा सीआयडी मालिका सुरु करा.

दरम्यान, सीआयडी या मालिकेतून अनेक कलाकारांना नवीन ओळख मिळाल्याचे दिसून आले आहे. या मालिकेने प्रेक्षकांचे अनेक वर्षे भरभरुन मनोरंजन केले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com