Double XL Dainik Gomantak
मनोरंजन

Double XL चा धमाकेदार टीझर रिलीज; सोनाक्षीच्या जबरदस्त डायलॉग्सने वेधलं चाहत्यांचे लक्ष

Double XL Teaser:या चित्रपटाच्या टीझरमधील हुमा आणि सोनाक्षीच्या डायलॉग्सने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे.

दैनिक गोमन्तक

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि हुमा कुरेशी यांच्या 'डबल एक्सएल' (Double XL) या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. या टीझरमध्ये बॉडी शेमिंग आणि वाढलेलं वजन या विषयी बोलताना दिसत आहेत. या टीझरमधील हुमा आणि सोनाक्षीच्या लूकने आणि डायलॉग्सने प्रेक्षकांचे लक्ष वेधले आहे.

बॉडी शेमिंग या गंभीर विषयाबद्दल अगदी मजेशीर पद्धतीने बोलण्याऱ्या दोन मैत्रिणी 'डबल एक्सएल' या चित्रपटाच्या टीझरमध्ये दिसत आहे. टीझरमध्ये हुमा ही निळा टुपीस आणि ब्लॅक जॅकेच अन् चष्मा अशा लूकमध्ये दिसत आहे. सोनाक्षी ही पिंक टॉप व्हाईट जॅकेट आणि ग्रीन कलर हेअर अशा लूकमध्ये दिसत आहे. दोघींच्या हटके लूकने प्रेक्षकांचे लक्ष वेधले आहे.

सोनाक्षी सिन्हा आणि हुमा कुरेशी यांच्यासोबतच जहीर इकबाल आणि तमिळ चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता महत राघवेंद्र हे कलाकार प्रमुख भूमिका साकारणार आहेत. एका मुलाखतीत जहीरनं सांगितलं, 'या चित्रपटासाठी सोनाक्षी आणि हुमा यांना वजन वाढवायचे होते. त्यांनी चित्रपटासाठी 15-20 किलो वजन वाढवले आहे. त्या शूटिंग दरम्यान फक्त खात होत्या.' महत राघवेंद्र हा या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये (Bollywood) पदार्पण करत आहे.

सतराम रमणी यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. तर भूषण कुमार, कृष्ण कुमार, विपुल डी शाह, राजेश बहल आणि अश्विन वर्दे, साकिब सलीम, हुमा कुरेशी आणि मुदस्सर अजीज यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. हा चित्रपट 14 ऑगस्ट रोजी रिलीज होणार आहे. चित्रपटाचा टीझर रिलीज पाहिल्यानंतर आता हुमा आणि सोनाक्षी यांचे चाहते या चित्रपटाची उत्सुकतेने वाट बघत आहेत.

डबल एक्सएल या चित्रपटातील हुमा आणि सोनाक्षी यांच्या जोडीला पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. हुमाच्या महारानी या वेब सीरिजला प्रेक्षकांची पसंती मिळाली तसेच तिच्या बदलापूर, गँग्स ऑफ वासेपूर आणि जॉली एल एल बी या चित्रपटातील अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकली. तसेच दबंग गर्ल सोनाक्षी सिन्हाच्या चित्रपटांना देखील प्रेक्षकांची पसंती मिळते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lessons from Animals: प्राण्यांकडूनही शिकता येतात जीवनाचे धडे! मुंग्यांची शिस्त, पक्ष्यांची मेहनत अन् निसर्गाची जादू

Bangladesh Resort Fire: बांगलादेशात रिसॉर्टला भीषण आग, 10 जणांचा होरपळून मृत्यू; जीव वाचवण्याची संधीच मिळाली नाही VIDEO

Trigrahi Yog 2026: ग्रहांच्या फेरबदलाचा मोठा चमत्कार! त्रिग्रही आणि बुधादित्य योगाच्या संयोगाने उजळणार 3 राशींचे भाग्य; होणार अफाट धनलाभ

INS Samarthak Warship: भारताची पहिली बहुउद्देशीय युद्धनौका 'समर्थक' नौदलात दाखल; सागरी सुरक्षा होणार अधिक मजबूत!

Hero च्या दोन नव्या बाइक्स लॉन्च! किंमत 1.27 लाखांपासून सुरू, क्रूझ कंट्रोलसह मिळणार अनेक भन्नाट फीचर्स

SCROLL FOR NEXT