Rajveer- Sunny Deol Dainik Gomantak
मनोरंजन

Dono Box Office Collection: शेवटी बापच ठरला सव्वाशेर; बॉक्स ऑफीसवर कमाई करण्यात राजवीर ...

Dono Box Office Collection: 'दोनों' असे या चित्रपटाचे नाव असून पूनम ढिल्लों ची मुलगी पलोमा ढिल्लोंने देखील या चित्रपटातून डेब्यू केला आहे.

दैनिक गोमन्तक

Dono Box Office Collection: सनी देओल बऱ्याच काळानंतर पडद्यावर आला आणि त्याच्या चित्रपटाने बॉक्स ऑफीसवर धुमाकूळ घातला. गदर २ ने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केल्याचे केल्याचे पाहायला मिळाले.

आता सनीच्या मुलाने म्हणजेच राजवीरने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले आहे. 'दोनों' असे या चित्रपटाचे नाव असून पूनम ढिल्लों ची मुलगी पलोमा ढिल्लोंने देखील या चित्रपटातून डेब्यू केला आहे. राजश्री प्रोडक्शनचा हा चित्रपट असून या चित्रपटाकडून प्रेक्षकांच्या बऱ्याच अपेक्षा होत्या.

बॉक्स ऑफीसवर किती केली कमाई?

सनी( Sunny Deol)च्या ब्लॉकबस्टर चित्रपटानंतर आता राजवीरचा चित्रपट किती कमाई करणार अशी उत्सुकता सर्वांना लागली आहे. मात्र राजवीरचा चित्रपट म्हणावी तशी कमाई करु शकला नाही.

मिळालेल्या माहीतीनुसार, पहिल्या दिवशी हा चित्रपट केवळ ३५ लाख रुपए इतकी कमाई करु शकला आहे. संपूर्ण जगभरात ४१ लाख इतकी कमाई झाली आहे.

असे म्हटले जात आहे की, राजश्री प्रोडक्शनला ७६ वर्षे पूर्ण झाल्याने सेलिब्रेशन म्हणून हा चित्रपट प्रदर्शित केला जात आहे. महत्वाचे म्हणजे, सूरज बडजात्या यांच्या मुलगा अविनाश बडजात्या यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. सर्वात जुने प्रोडक्शन हाऊस आपला वारसा पुढे नेत आहे कारण राजश्रीची चौथी पिढी या पदाची सूत्रे हाती घेण्यास तयार असल्याचे म्हटले जात आहे.

५ ऑक्टोबरला प्रदर्शित झालेला हा 'दोनों' हा चित्रपट मर्यादित स्क्रीनवरच दाखवला गेला आहे. जसजशी चित्रपटाला गती मिळेल तसतशी स्क्रीन्सची संख्या हळूहळू वाढत जाईल, असेही सांगण्यात आले आहे. देशभरात केवळ 273 स्क्रीन्सवर हा चित्रपट( Movie ) प्रदर्शित झाल्याचे सांगण्यात आले.

'हम आपके है कौन' ते 'उंचाई' या चित्रपटांबद्दल राजश्री प्रोडक्शनने एक खास परंपरा कायम ठेवली आहे. राजश्री प्रॉडक्शनने नेहमीच आपले चित्रपट मर्यादित पडद्यावर प्रदर्शित करून हळूहळू स्क्रीन्सची संख्या वाढवण्याची रणनीती कायम ठेवल्याचे बोलले जात आहे.

त्यांच्या मते, 'हम आपके है कौन'पासून 'उंचाई'पर्यंत ही परंपरा पाळली जात आहे. आणि हाच फॉर्म्युला 'दोनो' रिलीज करून पुढे नेण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. आता राजवीरचा चित्रपट किती कमाई करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

Goa News: अडवलपालमध्ये गढूळ पाण्याचा पुरवठा, 'फोमेंतो' कंपनीच्या रिजेक्शनमुळे समस्या; वाचा गोव्यातील दिवसभरातील ठळक घडामोडी

SCROLL FOR NEXT