Manoj Kumar Birthday Dainik Gomantak
मनोरंजन

Manoj Kumar Birthday : जेव्हा भारताच्या पंतप्रधानांच्या सांगण्यावरुन या दिग्दर्शकाने बनवला होता हा चित्रपट...

दिग्दर्शक मनोज कुमार यांनी भारताचे तत्कालीन पंतप्रधान लाल बहादुर शास्त्री यांच्या सांगण्यावरुन चित्रपट बनवला होता

Rahul sadolikar

भारतीय चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते, निर्माता, दिग्दर्शक मनोज कुमार यांचा आज वाढदिवस आहे. 24 जुलै 1937 रोजी पाकिस्तानातील अबोटाबाद येथे जन्मलेले मनोज कुमार आज त्यांचा 86 वा वाढदिवस साजरा करत आहेत. 

देशभक्तीपर चित्रपटांसाठी ओळखलं जायचं

मनोज कुमार यांचे हिंदी चित्रपटसृष्टीतील योगदान कधीही विसरता येणार नाही, विशेषतः देशभक्तीपर चित्रपटांसाठी. त्यामुळे मनोज कुमार यांना भारत कुमार या नावानेही ओळखले जाते. तत्कालीन पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांनी मनोज कुमार यांचा 'शहीद' चित्रपट पाहिला तेव्हा ते इतके प्रभावित झाले की त्यांनी मनोज कुमार यांना त्यांच्या 'जय जवान जय किसान' या घोषणेवर चित्रपट बनवण्याची सूचना केली.

जय जवान जय किसान घोषणेवर चित्रपट बनवा

1965 मध्ये रिलीज झालेल्या 'शहीद' चित्रपटात मनोज कुमार प्रसिद्ध क्रांतिकारक भगतसिंग यांच्या भूमिकेत दिसले होते. प्रेक्षकांना हा चित्रपट खूप आवडला. हा चित्रपट पाहिल्यानंतर तत्कालीन पंतप्रधान लाल बहादूर यांनी मनोज कुमार यांच्याशी दीर्घ संवाद साधला होता. आणि मनोज कुमार यांना त्यांच्या 'जय जवान जय किसान' या घोषणेवर चित्रपट बनवण्याची सूचना केली. 1965 मध्ये भारत-पाकिस्तान युद्धाच्या वेळी पंतप्रधानांनी अलाहाबाद (आता प्रयागराज) येथील जाहीर सभेत ही घोषणा दिली होती.

लाल बहादूर शास्त्री यांच्या भेटीनंतर...

तत्कालीन पंतप्रधानांची भेट घेतल्यानंतर मनोजकुमार त्यांच्या बोलण्याने प्रभावित झाले. झी न्यूजच्या लोकप्रिय माहितीपट 'बॉलिवूड बाजीगर'साठी दिलेल्या मुलाखतीदरम्यान, मनोज कुमार म्हणतात, 'मी विमानात घाबरून जातो आणि म्हणूनच मी ट्रेनने प्रवास करणे पसंत करतो. त्या दिवशी मी दिल्ली स्टेशनवर पोहोचल्यावर ट्रेनमध्ये चढण्यापूर्वी मी तेच रजिस्टर विकत घेतले. दिल्लीहून घरी परतताना मी 'उपकार' चित्रपट लिहिला होता. शास्त्रीजींच्या सांगण्यावरूनच मी हा चित्रपट लिहिला हे खरे आहे. मी चित्रपट निर्माता होण्यापूर्वी देशाचा शेतकरी आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asia Cup 2025: 'चायनामन'ची जादुई गोलंदाजी! UAE विरुद्ध एकाच षटकात घेतल्या 3 विकेट्स, पण हॅटट्रिक हुकली VIDEO

Konkan Railway: रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! दसरा-दिवाळीसाठी कोकण रेल्वे मार्गावर विशेष गाड्यांची घोषणा; जाणून घ्या वेळापत्रक

आतिशी भाजपची बाहुली, दारू घोटाळ्यातील नेत्यांना वाचवण्यासाठी त्यांची धडपड सुरुये; गोवा काँग्रेसची बोचरी टीका

Goa Land Scam: 1200 कोटींच्या भूखंड घोटाळ्याचा पर्दाफाश, ईडीची गोवा आणि हैदराबादमध्ये छापेमारी, 72 लाखांसह 7 आलिशान गाड्या जप्त

पोर्तुगीजांनी नष्ट केलेल्या 1,000 मंदिरांच्या स्मरणार्थ स्मारक मंदिर उभारणार; दिवाडी बेटावर गोवा 'कोटीतिर्थ कॉरिडॉर' प्रकल्प राबवणार

SCROLL FOR NEXT