Dhurandhar 2 Trailer Dainik Gomantak
मनोरंजन

Dhurandhar 2 Trailer: हिंदू बहुत ही डरपोक... ! 'धुरंधर 2'चा ट्रेलर रिलीज, हमजा अली अब्बासीच्या क्रूर लूकने वेधलं लक्ष VIDEO

Dhurandhar 2 Trailer Released: भारतीय चित्रपटसृष्टीतील बहुप्रतिक्षित 'धुरंधर २' या चित्रपटाचा अधिकृत ट्रेलर अखेर प्रदर्शित झाला असून, त्याने सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे.

Sameer Amunekar

मुंबई: भारतीय चित्रपटसृष्टीतील बहुप्रतिक्षित 'धुरंधर २' या चित्रपटाचा अधिकृत ट्रेलर अखेर प्रदर्शित झाला असून, त्याने सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. ३ मिनिटे २५ सेकंदांच्या या ट्रेलरमध्ये ॲक्शनचा असा काही धमाका पाहायला मिळतोय की, प्रेक्षकांची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. पहिल्या भागाच्या प्रचंड यशानंतर आता दुसरा भाग बॉक्स ऑफिसवर नवे विक्रम प्रस्थापित करण्यासाठी सज्ज झाला आहे.

ल्यारीचा नवा बादशाह कोण?

ट्रेलरची सुरुवात एका महत्त्वाच्या प्रश्नाने होते., 'रहमान डकैत'च्या मृत्यूनंतर आता ल्यारीच्या साम्राज्यावर राज्य कोण करणार? ट्रेलरमधील दृश्यांवरून असे स्पष्ट जाणवते की, रणवीर सिंगने या साम्राज्यावर आपली पकड मजबूत केली आहे. एका बाजूला पाकिस्तानमधील लोक रणवीरच्या विजयाचा जल्लोष साजरा करताना दिसतात, तर दुसरीकडे जेव्हा रणवीरचे खरे सत्य समोर येते, तेव्हा सर्वांच्या पायाखालची जमीन सरकते. रणवीरचा हा नवा आणि रहस्यमय लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे.

तगडी स्टारकास्ट आणि अंगावर काटा आणणारे संवाद

चित्रपटात केवळ रणवीर सिंगच नाही, तर संजय दत्तचा भारदस्त अभिनय आणि अर्जुन रामपालचा आतापर्यंतचा सर्वात धोकादायक अवतार पाहायला मिळत आहे. या ट्रेलरमधील एक संवाद सध्या तुफान व्हायरल होत आहे, तो म्हणजे "पाकिस्तानचा मुस्तकबिल (भविष्य) आता हिंदुस्तान ठरवणार!" या एका संवादाने सोशल मीडियावर चर्चेला उधाण आणले असून, चित्रपटात देशप्रेमाचा आणि सूडाचा जबरदस्त तडका असणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

'धुरंधर २' येत्या १९ मार्च रोजी सिनेमागृहात धडकणार आहे. विशेष म्हणजे, याच दिवशी दाक्षिणात्य सुपरस्टार यशचा 'टॉक्सिक' चित्रपट प्रदर्शित होणार होता. मात्र, मध्य पूर्वेतील तणावामुळे 'टॉक्सिक'च्या निर्मात्यांनी प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलून ४ जून केली आहे. यामुळे आता ईदच्या मुहूर्तावर बॉक्स ऑफिसवर होणारी मोठी टक्कर टळली असून, 'धुरंधर २' ला सोलो रिलीजचा मोठा फायदा मिळण्याची शक्यता आहे.

पहिल्या भाग

या चित्रपटाच्या पहिल्या भागाने भारतीय बॉक्स ऑफिसवर ८३८.५० कोटी रुपयांची कमाई केली होती, तर जगभरात १३०५.३५ कोटींचा गल्ला जमवला होता. अक्षय खन्ना, आर. माधवन आणि सारा अर्जुन यांसारख्या कलाकारांच्या अभिनयाने सजलेला हा चित्रपट आता दुसऱ्या भागात काय कमाल करतो, याकडे संपूर्ण सिनेसृष्टीचे लक्ष लागले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Road Accident: 'काळापुढे कुणाचे चालत नाही?' अकाली मृत्यूंच्या मालिकेनं हादरला 'गोवा'!

Lucky Zodiac Signs: निर्जला एकादशीला जुळून येतोय 'द्विद्वादश' आणि 'नवपंचम' योग, 'या' 4 राशींच्या नशिबात होणार सुवर्णबदल; गुंतवणुकीतून होणार पैशांचा पाऊस

Nuvem Apartment Project: 400 मीटर जागेत 8 फ्लॅट्स कसे? नुवेतील नागरिकांचा प्रशासनाला संतप्त सवाल, कचरा, पार्किंगचा प्रश्न ऐरणीवर; लवकरच कारवाई?

Konkani Language: गोव्यातूनच कोकणी हद्दपार होण्याच्या मार्गावर? CM सावंतांनी व्यक्त केली खंत: म्हणाले, "60 टक्के घरांतून कोकणी गायब...!"

8th Pay Commission पूर्वी मोदी सरकारचा महाधमाका! 'या' कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन योजना लागू; कोण आहेत मानकरी?

SCROLL FOR NEXT