Dhurandhar 2 box office collection day 1 Dainik Gomantak
मनोरंजन

Dhurandhar 2 Collection: बॉक्स ऑफिसवर 'हमजा अली'चा धुमाकूळ! पहिल्याच दिवशी तोडला मोठा विक्रम; कलेक्शन 100 कोटी पार

Dhurandhar 2 Day 1 Collection: रणवीर सिंगचा बहुप्रतीक्षित ‘धुरंधर 2: द रिव्हेंज’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर धडाकेबाज सुरुवात करत इतिहास घडवण्यात यशस्वी ठरला आहे.

Sameer Panditrao

Dhurandhar 2 Collection : रणवीर सिंगचा बहुप्रतीक्षित ‘धुरंधर 2: द रिव्हेंज’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर धडाकेबाज सुरुवात करत इतिहास घडवण्यात यशस्वी ठरला आहे. पहिल्याच दिवशी 100 कोटींचा टप्पा पार करणारा हा पहिला बॉलिवूड चित्रपट ठरला असून, हिंदी चित्रपटसृष्टीसाठी नवा मापदंड निर्माण झाला आहे. दिग्दर्शक आदित्य धर यांच्या या स्पाय थ्रिलरने 19 मार्च रोजी जगभरात प्रदर्शित होताच प्रेक्षकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळवला.

विशेष म्हणजे, चित्रपटाच्या अधिकृत प्रदर्शनापूर्वीच त्याची दमदार सुरुवात झाली होती. निर्मात्यांनी बुधवारी सायंकाळी काही निवडक देशांमध्ये पेड प्रिव्ह्यू शो आयोजित केले होते. या प्रिव्ह्यूमधूनच चित्रपटाने देशांतर्गत तब्बल 43 कोटी रुपयांची कमाई केली. याआधी ‘स्त्री 2’ने 2024 मध्ये 10 कोटींचा प्रिव्ह्यू रेकॉर्ड केला होता, तो ‘धुरंधर 2’ने सहज मागे टाकला.

या दमदार सुरुवातीमुळे चित्रपटाने पहिल्याच दिवशी अभूतपूर्व गती मिळवली. चित्रपटाने पहिल्या दिवशी 103 कोटींची कमाई केली असून, प्रिव्ह्यूसह एकूण आकडा 146 कोटींवर पोहोचला आहे.

त्यामुळे बॉलिवूडमधील सर्वात मोठ्या ओपनिंगचा विक्रम ‘धुरंधर 2’च्या नावावर नोंदवला गेला आहे.

चित्रपटाच्या डब्ड व्हर्जन्सनाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. तेलुगू आवृत्तीने 2 कोटींपेक्षा अधिक कमाई केली असून, तमिळ व्हर्जनही जवळपास त्याच मार्गावर आहे. मल्याळम आणि कन्नड आवृत्त्यांना वीकेंडमध्ये अधिक गती मिळण्याची शक्यता आहे.

‘धुरंधर 2’ने ‘पठाण’, ‘जवान’, ‘अॅनिमल’ आणि ‘स्त्री 2’ सारख्या सुपरहिट चित्रपटांचे ओपनिंग रेकॉर्ड मोडले आहेत. या चित्रपटात रणवीर सिंगसोबत आर. माधवन, अर्जुन रामपाल, संजय दत्त, सारा अर्जुन आणि राकेश बेदी यांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे.

पहिल्या भागाने जगभरात 1300 कोटींची कमाई करत मोठा यश मिळवले होते. त्याच पार्श्वभूमीवर ‘धुरंधर 2’कडूनही पुढील काही दिवसांत आणखी विक्रम होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Panaji Municipal Garden: काँक्रिटच्या विळख्यात पणजीची हिरवाई जपणारं एक अद्भूत स्थान; 'जार्दिम गार्सिया द ओर्ता'

Pakistan ODI Cricket Record: वनडे क्रिकेटमधील लाजिरवाणा रेकॉर्ड; एकाच डावात 6 फलंदाज 'डक'वर आऊट, क्रिकेट विश्वात पाकड्यांची पुन्हा नाचक्की

Crime News: 15 व्या वर्षी लग्न, दोनदा तीन तलाक अन् हलालाचा 'नरक'! लैंगिक शोषणाच्या प्रकरणावर हाय कोर्टाने ओढले ताशेरे; म्हणाले, 'अशा प्रथा...'

Shukra Chandra Yuti 2026: 16 जुलैला आकाशात महासंयोग! शुक्र-चंद्राची युती 'या' 5 राशींना बनवणार करोडपती; लव्ह लाईफमध्येही मिळणार गूड न्यूज

PF New Rules Update: एक चुकीचा निर्णय अन् निवृत्तीचा फंड धोक्यात! इपीएफओचा नवा 1800 रुपयांचा नियम; जाणून घ्या सविस्तर

SCROLL FOR NEXT