Dhurandhar 2 Box Office Collection Dainik Gomantak
मनोरंजन

Dhurandhar 2 Box Office Collection: बॉक्स ऑफिसवर 'धुरंधर 2'चे वादळ! 10 दिवसांत 'इतक्या' कोटींची कमाई, मोडले अनेक चित्रपटांचे रेकॉर्ड

Dhurandhar 2 Box Office Collection Day 10: बॉलीवूड सुपरस्टार रणवीर सिंह आणि दिग्दर्शक आदित्य धर यांच्या जोडीने बॉक्स ऑफिसवर इतिहास रचला आहे.

Sameer Amunekar

बॉलीवूड सुपरस्टार रणवीर सिंह आणि दिग्दर्शक आदित्य धर यांच्या जोडीने बॉक्स ऑफिसवर इतिहास रचला आहे. 'धुरंधर: द रिव्हेंज' या चित्रपटाने प्रदर्शनाच्या अवघ्या १० दिवसांत जागतिक स्तरावर ११०० कोटी रुपयांहून अधिक कमाई करून सर्वांना थक्क केले आहे. २०१५ च्या ब्लॉकबस्टरनंतर आलेल्या या दुसऱ्या भागाने भारतीय चित्रपटसृष्टीतील 'बाहुबली २', 'जवान' आणि 'पुष्पा २' सारख्या महाकाय चित्रपटांच्या कमाईच्या वेगालाही मागे टाकले आहे.

सलग आठ दिवस ४० कोटींहून अधिकची कमाई

'धुरंधर २' ने केवळ पहिल्या दिवशी १०२.५५ कोटींची विक्रमी कमाई केली नाही, तर हा चित्रपट सातत्य टिकवून ठेवण्यातही यशस्वी ठरला आहे. इंडस्ट्री ट्रॅकर 'सॅकनिल्क'च्या (Sacnilk) अहवालानुसार, या चित्रपटाने सलग आठ दिवस दररोज ४० कोटी रुपयांहून अधिक नेट कलेक्शन केले आहे. भारतीय चित्रपट इतिहासात अशा प्रकारचे सातत्य फार कमी चित्रपटांना दाखवता आले आहे. शनिवारी २८ मार्च रोजी देखील या चित्रपटाने ३९.९८ कोटींची कमाई करत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.

जगभरात ११५१ कोटींचा गल्ला; हिंदी पट्ट्यात मोठी पसंती

१८ मार्च रोजी पेड प्रिव्ह्यूने सुरुवात करणाऱ्या या चित्रपटाने आतापर्यंत जगभरात ११५१.२२ कोटी रुपयांचा आकडा पार केला आहे. भारतात या चित्रपटाचे एकूण कलेक्शन ७५५.९० कोटी रुपये झाले आहे. विशेष म्हणजे हिंदी भाषिक प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाची क्रेझ सर्वाधिक असून, शनिवारी हिंदी आवृत्तीसाठी ५७.३% ऑक्युपन्सी नोंदवण्यात आली. तमिळ आणि तेलगू भाषेतही चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

दिग्गज कलाकारांची फौज आणि आदित्य धरचे दिग्दर्शन

'उरी' फेम दिग्दर्शक आदित्य धर यांनी या चित्रपटाचे भव्य सादरीकरण केले आहे. रणवीर सिंहच्या जोडीला संजय दत्त, अर्जुन रामपाल, आर. माधवन यांसारख्या तगड्या कलाकारांच्या अभिनयाने चित्रपटाला चार चाँद लावले आहेत. राकेश बेदी, गौरव गेरा आणि सारा अर्जुन यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका यात आहेत. जिओ स्टुडिओज आणि बी६२ स्टुडिओजच्या बॅनरखाली तयार झालेला हा चित्रपट येत्या काळात आणखी कोणते नवे विक्रम प्रस्थापित करतो, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sanjeel Kudchadkar Kidnapping Case: "चलत्या गाडीत गळा दाबून मारण्याचा प्रयत्न!" संजील कुडचडकरची धक्कादायक जबानी; पत्नी लुईझा अद्याप बेपत्ताच

Jantar Mantar Student Protest: आंदोलक दहशतवादी होते का? लोकसभेत प्रियांका गांधींचा रुद्रअवतार; विद्यार्थ्यांच्या दडपशाहीवरुन मोदी सरकारवर हल्लाबोल

Goa Drowning Incident: उधाणलेल्या लाटा अन् जीवरक्षकांचे शौर्य! सलग तीन दिवसांत 3 होड्या उलटल्या; कोलवा आणि बाणावलीत 28 मच्छीमारांची सुखरुप सुटका

Goa ECO Sensitive Zone: गोवा सरकारला केंद्राचा मोठा झटका! 21 गावे वगळण्याची मुख्यमंत्र्यांची विनंती अमान्य; 108 गावांवर 'जैवसंवेदनशील'ची टांगती तलवार

Horoscope 29 July 2026: बुधवारचा दिवस ठरणार भाग्यवान! 'या' राशींना लागणार जॅकपॉट; धनाचा होणार वर्षाव

SCROLL FOR NEXT