Dhanashree Verma| yuzvendra chahal  Dainik Gomantak
मनोरंजन

Dhanashree Verma: चहल-धनश्रीच्या नात्यात का रे दुरावा? इंस्टाग्रामवरून काढले आडनाव

यूट्यूबर धनश्री वर्माने आपल्या इन्स्टाग्रामवरून पती युजवेंद्र चहलचे आडनाव काढून टाकले असुन सोशल मिडीयावर चर्चेत आले आहे.

दैनिक गोमन्तक

टीम इंडियाचा स्पिनर युजवेंद्र चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा हे सोशल मिडीयावरचर्चेचा भाग राहतात. दोघेही सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. दररोज त्यांचे रोमँटिक फोटो शेअर करत असतात. कधी-कधी युजवेंद्र धनश्रीसोबत डान्स करताना दिसतो. सध्या दोघांमध्ये काही चांगले चालले नसल्याचे दिसते. धनश्रीने असे काही केले की, ज्यानंतर चाहत्यांना धक्का बसला आहे. धनश्रीने तिच्या पतीचे आडनाव इन्स्टाग्रामवरून हटवले आहे. युझवेंद्रने (Yuzvendra Chahal) एक पोस्ट शेअर केल्यानंतर हा प्रकार घडला आहे. धनश्रीची पोस्ट पाहता त्यांचे नाते कठीण टप्प्यातून जात असल्याचे दिसत आहे.

युझवेंद्र आणि धनश्री 2020 मध्ये लग्नबंधनात अडकले. तिने तिच्या लग्नाचे फोटो शेअर करून चाहत्यांना आश्चर्यचकित केले. दोघांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. लग्नात दोघेही खूप सुंदर दिसत होते, पण आता आडनाव काढून टाकल्यानंतर त्यांच्या नात्यात दुरावा आल्याचे दिसते आहे.

* धनश्रीने बदलले आडनाव

धनश्रीने तिच्या पतीचे आडनाव इन्स्टाग्रामवरून काढले आहे. लग्नानंतर धनश्रीने आपल्या नावात युझवेंद्रचे आडनाव 'चहल' जोडले होते. पण आता धनश्रीने तिचे आडनाव काढून टाकले आहे. त्यानंतर दोघांच्या नात्यात दुरावा आला आहे.

युझवेंद्रच्या पोस्टनंतर धनश्रीने तिचे आडनाव बदलले. युझवेंद्रने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक फोटो शेअर केला आहे ज्यामध्ये 'न्यू लाइफ लोडिंग' असे लिहिले आहे.

धनश्री आणि युझवेंद्र यांची भेट ऑनलाइन क्लासदरम्यान झाली होती. ऑनलाइन क्लास सुरू असताना दोघांमध्ये संवाद वाढला होता. त्यानंतर त्यांनी त्यांच्या नात्याचा पाठपुरावा करण्याचा निर्णय घेतला आणि ऑगस्ट 2020 मध्ये लग्न केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today Live Updates: आलेक्स सिक्वेरांचे नोकरी विक्री माफियांना संरक्षण, पणजीकरांचा हल्लाबोल

Vishwajit Rane: 'बनावट कागदपत्रे' तयार करणे हा फौजदारी गुन्हा! मंत्री राणेंनी दिले तक्रार नोंदविण्याचे निर्देश

'Cash For Job' घोटाळ्यातील सर्वांचेच राजकारण्यांशी संबंध! 'प्रियोळ कनेक्शन'ची जोरदार चर्चा; मध्यस्थांना पळताभुई थोडी

Rashi Bhavishya 10 November 2024: धनाची प्राप्ती होईल, तरीही अनावश्यक खर्च टाळा जाणून घ्या काय सांगतयं 'या' राशीचं भविष्य

Professional League 2024: 'धेंपो क्लब'चा निसटता पराभव! सलग सहाव्या विजयासह 'स्पोर्टिंग द गोवा' अग्रस्थानी

SCROLL FOR NEXT