Bigg Boss 17 Dainik Gomantak
मनोरंजन

Bigg Boss 17: 'अंकितासाठी मला वाईट वाटत आहे' असं का म्हणाली देवोलिना

Bigg Boss 17: गेल्या एका महिन्यात हे अनेकवेळा प्रेक्षकांनी ऐकले आहे. मात्र यामध्ये सुधारणा होत नसल्याचे दिसत आहे.

दैनिक गोमन्तक

Bigg Boss 17: बिग बॉसचा १७ वा सीझन चांगलाच चर्चेत आहे. घरातील सदस्य रोज आपल्या वादांमुळे चर्चेत येत असतात. आता या सीझनमध्ये दोन जोड्यादेखील सामील झाल्या आहेत. ऐश्वर्या शर्मा-नील भट्ट आणि अंकिता लोखंडे- विकी जैन या जोड्यांनी प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. मात्र यांच्यातील प्रेम दिसण्याऐवजी फक्त भांडणेच जास्त दिसत असल्याने टीव्ही कलाकार देखील यावर बोलत आहेत.

साथ निभाना साथिया आणि बिग बॉस च्या १४ व्या सीझनचा भाग असलेल्या देवोलिना भट्टाचार्जीने अंकिताबद्दल काळजी व्यक्त केली आहे. विकी त्यांचे व्यक्तीगत आयुष्य खराब करत असल्याचे देवोलिनाने म्हटले आहे.

'बिग बॉस 17'मध्ये अंकिता लोखंडेसोबत विकी जैन ज्या पद्धतीने वागतो ते बाहेरच्या जगाला आवडत नसल्याचे अनेकांच्या म्हणण्यातून समोर आले आहे. याआधीही सलमान खाननेदेखील त्याला फटकारले आहे. अंकिताही सतत तक्रार करत असते की विकी तिच्याकडे दुर्लक्ष करतो. वेळ देत नाही. गेल्या एका महिन्यात हे अनेकवेळा प्रेक्षकांनी ऐकले आहे. मात्र यामध्ये सुधारणा होत नसल्याचे दिसत आहे.

आता देवोलिना भट्टाचार्जीने एक्सवर ट्वीट करत विकीच्या वागण्यामुळे मला अंकितासाठी वाईट वाटत असल्याचे म्हटले आहे. ज्याप्रकारे विकीला बिग बॉसने डोक्यावर बसवले आहे, त्यामुळे तो ताठ मानेने तर चालणारच आहे. मात्र स्वत:चे स्वार्थी व्यक्तीमत्व सिद्ध करण्याच्या नादात तो व्यक्तीगत आयुष्य खराब करत आहे. घरात आल्यापासून तो ज्याप्रकारे अंकिताबरोबर वागत आहे. त्यामुळे मला अंकितासाठी वाईट वाटत असल्याचे तिने सोशल मिडियावर म्हटले आहे.

दरम्यान, याआधी प्रतिक्रिया देताना काम्या पंजाबी म्हणाली होती की, दोघेही शोमध्ये एकत्र यायला नको होते. आता बिग ब़ॉसमध्ये नवीन काय पाहायला मिळणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

SCROLL FOR NEXT