Dev Anand 100 th Birth Anniversary  Dainik Gomantak
मनोरंजन

Dev Anand Movie : "तो नवीन मुलगा आहे शिकेल हळूहळू" देव आनंद यांच्या आठवणीने जॅकी श्रॉफ भावुक

बॉलीवूडचे एकेकाळचे सुपरस्टार देव आनंद यांची आज 100 वी जयंती त्यानिमित्त पाहुया अभिनेता जॅकी श्रॉफ यांनी त्यांची सांगितलेली एक आठवण...

Rahul sadolikar

Jackie Shroff talking about Dev Anand : हातांची लयबद्ध हालचाल, केसांची अनोखी स्टाईल या जोरावर बॉलीवूडच्या एका सुपरस्टारने चॉकलेट बॉयचा किताब पहिल्यांदा मिळवला.

गाईड, ज्वेलथिफ, CID यांसारख्या चित्रपटांमधुन प्रेक्षकांना वेड लावणाऱ्या 60 च्या दशकातील एक सुपरस्टारचा आज वाढदिवस. बरोबर आम्ही बोलत आहोत सुपरस्टार देव आनंद यांच्याबद्दल

देव आनंद यांची 100 वी जयंती

एव्हरग्रीन सुपरस्टार देव आनंद यांची आज 100 वी जयंती. देव साहेब याच नावाने ते इंडस्ट्रीत ओळखले जायचे. त्या काळातल्या प्रेक्षकांची मनोरंजनाची आवड लक्षात घेता देव साहेबांची स्टाईल चाहत्यांची डोक्यावर घेणं साहजिक होतं.

तेरे मेरे सपने या गाईड चित्रपटातल्या सुपरहिट गाण्यात 'देव आनंद' या सुपरस्टारचा करिश्मा दिसतो. वहिदा रहमान यांच्यासोबत संध्याकाळच्या वाऱ्याच्या झुळुकेने आपल्या प्रेयसीला समजावणारा एक प्रेमवेडा तरुण देव साहेबांनी साकारला आहे. बॉलीवूड अभिनेते जॅकी श्रॉफ यांनी देव आनंद यांचा एक किस्सा सांगितला आहे.

Dev Anand 100 th Birth Anniversary

जॅकी श्रॉफ यांनी सांगितल्या आठवणी

जॅकी श्रॉफ यांनी 'हिंदुस्तान टाईम्स'ला दिलेल्या एका मुलाखतीत देव आनंद यांनी एका कठीण काळात कशी मदत केली? याबद्दल सांगितलं आहे. देव साहेब माणूस म्हणून कसे होते? याबद्दलही जॅकी श्रॉफ यांनी या मुलाखतीत सांगितले आहे.

 जॅकी श्रॉफ यांनी देव आनंद यांच्या 'स्वामी दादा' या चित्रपटातून सेकंड लीड अॅक्टर म्हणून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. 

जॅकी श्रॉफ यांना पाहून देव आनंद म्हणाले होते, 'मी सकाळी तुझा फोटो पाहिला आणि संध्याकाळी तू माझ्यासमोर उभा आहेस. मी तुला नक्कीच काम देईन.

Dev Anand 100 th Birth Anniversary

देव साहेब परिपूर्ण होते (Jackie Shroff talking about Dev Anand )

देव आनंद यांच्याबद्दल सांगताना जॅकी श्रॉफ पुढे म्हणाले, 'देव साहेबांनी माझ्यासाठी काम खूप सोपे केले. ते कधीही रिकामे बसले नाहीत आणि सर्वांसाठी काम करत राहिले. प्रत्येक वेळी पूर्णपणे तयार असलेल्या व्यक्तीचे ते उत्तम उदाहरण होते. 

मी त्याच्यासोबत चार चित्रपट केले आहेत आणि प्रत्येक प्रोजेक्टसाठी मला 15-30 दिवस शूटिंग करावे लागले. मी सेटवर काम केलं तितका वेळ देव आनंद साहेबांसोबत घालवला कारण ते नेहमी काम करत होते.

Dev Anand 100 th Birth Anniversary

कठीण सीन आणि देव आनंद यांची मदत

जॅकी श्रॉफ यांनी या मुलाखतीत एका सीनची आठवण सांगितली. हा एक अॅक्शन सीन होता तो सीन करणे जॅकी श्रॉफ यांना कठीण जात होते. तेव्हा देव आनंद मदतीला आले. 

या कठीण प्रसंगी देव आनंद यांनी दिलेल्या धीरामुळे जॅकी श्रॉफला प्रेरणा मिळाली. देव आनंद म्हणाले - तो नवीन मुलगा आहे, शिकेल. तेव्हा जॅकी श्रॉफ यांना एक आधार मिळाला की, मला पाठिंबा देण्यासाठी कोणीतरी आहे. 

म्हणून मी नवीन मुलांची काळजी घेतो

म्हणूनच या इंडस्ट्रीतल्या प्रत्येक नवीन मुलाची मी जशी काळजी घेतो तशीच काळजी मी माझा मुलगा टायगरची घेतो. पहिल्याच चित्रपटात देव साहेबांनी मला दयाळू आणि नम्र व्हायला शिकवलं.

मी सदैव ऋणी राहीन

जॅकी श्रॉफ या मुलाखतीत म्हणाले की, मी देव आनंदला आपला देव मानतो., 'देव आनंद माझा देव आहे. माझी आई माझी केसांची स्टाईल देव साहेबांसारखी करायची. 

मी त्याचे मॉर्निंग शो पहायचो. हा प्रवास माझ्यासाठी अतुलनीय आहे आणि त्यासाठी मी त्यांचा सदैव ऋणी राहीन.

ST Reservation Goa: 'काँग्रेसमुळे रखडले एसटी समाजाचे राजकीय आरक्षण'; सत्ताधारी - विरोधकांची सभागृहात खडाजंगी

Satyapal Malik Death: गोव्याचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन, ७९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Shukra Gochar 2025: पैशांचा पाऊस पडणार! शुक्र गोचरामुळे बदलणार 'या' राशींचे आयुष्य

लंडनचा फिल्ममेकर गोव्यात येतो! मराठी चित्रपट महोत्सवात पर्वणी; सुबोध भावे, सिद्धार्थ जाधव यांचे नवेकोरे सिनेमे पाहता येणार..

Goa Assembly Live: होंडा आयडीसी येथे घराला आग लागून मोठे नुकसान

SCROLL FOR NEXT