HBD Deepika Padukone Dainik Gomantak
मनोरंजन

HBD Deepika Padukone: डिंपल क्विन 2022 मध्ये 'या' कारणांमुळे राहली चर्चेत

आज दीपिकाच्या वाढदिवसानिमित्त तिच्या अनेक चाहत्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन तिला शुभेच्छा दिल्या आहेत.

दैनिक गोमन्तक

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री, डिंपल क्विन दीपिका पदुकोणचा आज 37 वा वाढदिवस आहे. दीपिका तिच्या अभिनयाने आणि स्टाईलने नेहमीच प्रेक्षकांची मने जिंकत असते. ये जवानी है दिवानीमधील नैना, ओम शांती ओममधील शांती, राम लिलामधील लीला यांसारख्या दीपिकाने साकारलेल्या भूमिकांना प्रेक्षकांची खास पसंती मिळाली आहे. आज दीपिकाच्या वाढदिवसानिमित्त तिच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन तिला शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

  • दीपिका2022 मध्ये या कारणांमुळे राहली चर्चेत

कान्स लूक

दीपिका कान्स फिल्म फेस्टिव्हल 2022 मध्ये सहभागी झाली होती. या फेस्टिव्हलची ती ज्युरी होती. कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या रेड कार्पेटसाठी दीपिका क्लासी लूकमुळे चर्चेत होता. कान्स फिल्म फेस्टिव्हलसाठी दीपिकाने केलेल्या लूकमधील तिनं परिधान केलेल्या नेकलेसनं अनेकांचे लक्ष वेधले होते. या नेटकलेसची किंमत चार कोटी 48 लाख रूपये होती. हा नेकलेस 18 कॅरेट व्हाईट गोल्ड, एमराल्ड आणि डायमंडपासून तयार केलेला होता.

फिफा वर्ल्ड कप

यंदा दीपिकाला फिफा वर्ल्ड कप 2022 ट्रॉफीच्या अनावरण सोहळ्यासाठी निमंत्रण देण्यात आले होते. फिफा वर्ल्ड कपच्या ट्रॉफीचे अनावरण करणारी दीपिका फक्त बॉलिवूडमधीलच नव्हे तर जगातील पहिली अभिनेत्री बनली आहे. दीपिकाने फिफा वर्ल्ड कप 2022 ट्रॉफीच्या अनावरण सोहळ्याला दीपिकानं ब्लॅक पँट, व्हाइट शर्ट आणि ब्राउन कलरचे लेदर कोट असा लूक केला होता. तिच्या या लूकला अनेक नेटकऱ्यांनी ट्रोल केले होते.

बेशरम रंग गाण्यातील बिकीनी

'पठाण' चित्रपटातील बेशरम रंग गाण्यामधील दीपिकाच्या बिकिनी लूकवरून वाद सुरु झाला. बेशरम रंग या गाण्यात अभिनेत्री दीपिकाने घातलेल्या बिकीनीच्या रंगावर काही लोकांनी आक्षेप घेतला आहे. या वादाला राजकिय वळण देखील आले आहे. तसेच चित्रपटामधील अनेक सीन्सला कात्री लागणार आहे.

दीपिकाची एवढ्या संपत्तीची आहे मालकिण

दीपिकानं अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. ती एका चित्रपटाचे जवळपास 15 ते 30 कोटी रुपये मानधन घेते. रिपोर्टनुसार, दीपिका ही जवळपास 314 कोटींच्या संपत्तीची मालकीण आहे. दीपिका अनेक प्रसिद्ध कंपन्यांची ब्रँड अॅम्बेसेडर आहे. यासाठी ती जवळपास 7 ते 10 कोटींची फी घेते. दीपिकाकडे अनेक लग्झरी गाड्या आहेत. तिच्याकडे ऑडी Q7, ऑडी A8, मिनी कन्वर्टिबल यांसारख्या गाड्या दीपिकाकडे आहेत.

दीपिकानं ओम शांती ओम या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तिच्या पिकू, पद्मावत, रामलिला, चैन्नई एक्सप्रेस आणि 'गेहराईयां' ये जवानी है दिवानी या चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 'ट्रेनच्या खिडकीतून बाहेर लटकणारे पाय अन्...'; चिमुकलीच्या व्हिडिओनं खळबळ; सोशल मीडियावर थरकाप व्हायरल

Sanjay Dutt Luxury Hotel In Goa: संजय दत्तचं गोव्यात आलिशान लक्झरी हॉटेल, उद्घाटनापूर्वीच रचला इतिहास; आंतरराष्ट्रीय स्तरावर ठरतंय चर्चेचा विषय

Vaidhriti Yoga: ऑफिसमध्ये वाद अन् प्रवासात नुकसान! सूर्य-चंद्राची अशुभ युती उडवणार झोप; वैधृती योग 'या' राशींसाठी ठरणार घातक

Delhi Student Protest: मुलांचा आक्रोश, अमानुष अत्याचार अन् रक्ताळलेलं 'आंदोलन'! शिक्षणातील लाल फितीविरुद्ध 'जेन-झी'चा आरपारचा रणसंग्राम

Anti Defection Law: सत्तेची चिता पेटवण्यासाठी निष्ठेचा बळी? राजकीय पक्षांतराच्या अनैतिक नाट्यावर ताशेरे; आमदार पळवणाऱ्या वृत्तीमुळे प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व धोक्यात

SCROLL FOR NEXT