Shah Rukh Khan  Dainik Gomantak
मनोरंजन

Pathan Box Office Collection: 6 दिवसांत 600 कोटी कमवण्यापासून 'पठाण' थोडक्यात हुकला...

अभिनेता शाहरुख खानचा पठाण 6 व्या दिवशी 600 कोटी कमावण्यापासुन थोडक्यात हुकला आहे.

Rahul sadolikar

शाहरुख खानचा 'पठाण' चित्रपट देशाबरोबरच परदेशातही कमाईचे नवे विक्रम करत आहे. देशभरात सहा दिवसांत हिंदी वर्जनमधुन २९४.५० कोटी रुपयांची कमाई करणाऱ्या या अॅक्शन फिल्मने जगभरात ५९१ कोटी रुपयांचे कलेक्शन केले आहे.

 हा चित्रपट सहा दिवसांत जगभरात 600 कोटींची कमाई करेल अशी अपेक्षा होती. पण पहिला सोमवार हा कामकाजाचा दिवस असल्याने थिएटरमधील कमाईचा वेग थोडा कमी झाला आहे.

 सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित, रिलीजच्या सहाव्या दिवशी, चित्रपटाने हिंदी आवृत्तीतून देशात 25 कोटी रुपयांची कमाई केली आहे, तर परदेशी बाजारपेठेत चित्रपटाने सोमवारी 16 कोटी रुपयांची कमाई केली आहे. 

देशात डब व्हर्जन म्हणजेच तमिळ आणि तेलुगूमध्ये या चित्रपटाने सोमवारी १०० कोटींचा गल्ला जमवला आहे.

यशराज फिल्म्सने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, 'पठाण' ने 6 दिवसात केवळ विदेशी बाजारातून $27.56 दशलक्ष म्हणजेच 224.6 कोटी रुपयांची कमाई केली आहे. भारतात, चित्रपटाने सहा दिवसांत तमिळ आणि तेलुगू वर्जनमधुन 10.75 कोटी रुपये कमवले आहेत. म्हणजेच हिंदी, तमिळ आणि तेलगूसह देशातील निव्वळ कलेक्शन 305.25 कोटी रुपये आहे. तर एकूण संकलन 366.40 कोटी रुपये आहे. 

'पठाण'च्या कमाईचा वेग पाहता हा चित्रपट आमिर खानच्या 'दंगल'चा विक्रम मोडून जगभरात कमाईत नंबर 1ची खुर्ची मिळवू शकेल का? आमिर खानचा 'दंगल' हा सध्या जगभरात सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट आहे. 

'दंगल'ने जगभरात 2023.81 कोटी रुपयांची कमाई केली.पठाणची सध्याची कमाई बघता तो दंगलचा रेकॉर्ड मोडेल हे निश्चित.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Theft: नवेवाडेतील चॅपेलमध्ये चोरी, संशयित अटकेत; सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी तासाभरात आवळल्या मुसक्या

सरकारला लॅपटॉप देेणारा निघाला गुन्‍हेगार, वैभव ठाकर महाराष्‍ट्र पोलिसांच्‍या कोठडीत; 200 कोटींच्‍या चोरीच्या सोन्याची खरेदी-विक्रीचा आरोप

Madgaon Municipality Recruitment: सीओंनी नोकर भरतीसंदर्भात कारवाई अहवाल द्यावा, पालिका प्रशासनाचे मडगाव नगरपालिकेला निर्देश

Goa Politics: पाटकर, सरदेसाईंमुळे तुटली युती; 'आरजी'ला संपविण्यासाठीच 'मास्टर प्लान', मनोज परब यांचा आरोप

Goa Road Accident: अतिवेगामुळे राज्‍यात दरमहा सरासरी 19 जणांचा मृत्‍यू! केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची राज्‍यसभेत माहिती

SCROLL FOR NEXT