Dadasaheb Phalke  Dainik Gomantak
मनोरंजन

Dadasaheb Phalke birth anniversary: दादासाहेब फाळकेंच्या त्या वेडाने आज भारतातली एक बलाढ्य इंडस्ट्री उभी राहिली..

चित्रपट महर्षी दादासाहेब फाळके यांची आज जयंती त्यानिमीत्ताने पाहुया त्यांचा जीवनप्रवास..

Rahul sadolikar

दादासाहेब फाळके ...चित्रपटाचं सोनेरी स्वप्न पाहिलेला एक अवलिया. लोकांच्या कुचेष्टेला सामोरे गेलेल्या दादासाहेबांनी पाहिलेलं चित्रपटाचं स्वप्न आज प्रत्येक भारतीय अभिमानाने मिरवतो आज चित्रपट हे सहज उपलब्ध असणारं माध्यम बनलं आहे त्याचं सारं श्रेय दादासाहेब फाळके नावाच्या महान आणि ध्येयवादी अवलियाला जातं.

चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांची आज जयंती. त्यांनी निर्माण केलेली ही चित्रपटाची जादू आज भारतभर पसरलीच नाही ते एक मोठं क्षेत्र बनली. म्हणूनच त्यांना चित्रपट महर्षी म्हणून ओळखले जाते. त्यानिमित्ताने पाहूया त्यांचा जीवनप्रवास.

दादासाहेबांचा जन्म 30 एप्रिल 1870 रोजी नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे झाला. दादासाहेबांना लहानपणापासूनच वेगवेगळ्या कला शिकण्याची आवड होती. त्यामुळे मराठा हायस्कूल, मुंबई येथे शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर 1885 मध्ये त्यांनी जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्स येथून एक वर्षाचा चित्रकलेचा पदविका अभ्यासक्रम पूर्ण केला.

त्यानंतर त्यांनी तैलरंगचित्रण, जलरंगचित्रण, वास्तुकला आणि नमुना प्रतिरूपण (मॉडेलिंग) यामध्ये सण 1890 ला प्रावीण्य मिळवले.

दादासाहेब फाळकेंनी चित्रपट तयार करायला सुरूवात केल्यानंतर त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारायला लागली. तसेच त्यांच्या अनेक चित्रपटांनी थिअटरला चांगली कमाई देखील केली. त्या काळात त्या चित्रपटातून इतके पैसे मिळाले की त्यांच्या घरी बैलगाडीभरून पैसे येतं होते. त्यानंतर पुढे त्यांनी अनेक प्रयोग केले, अनेक चित्रपट केले. आज आपण जे काही चित्रपट पाहत आहोत, त्यामागे दादासाहेब फाळके यांचेच अथक परिश्रम आहेत.

आपल्या 19 वर्षांच्या कारकिर्दीत 1937 पर्यंत दादासाहेब फाळकेंनी सुमारे 95 चित्रपट आणि 26 लघुपटांची निर्मिती केली. दादासाहेबांच्या या धडपडीमागे त्यांच्या पत्नी सरस्वतीबाई (दुसरी पत्नी) यांची मोलाची साथ होती. आपल्या पतीचे स्वप्नं सत्यात उतरविण्यासाठी सरस्वतीबाईंनी आपले दागिने देखील विकले.

चित्रपटाशी संबंधित लोकांचा स्वयंपाक करणे, त्यांचे कपडे धुणे, त्यांच्या राहण्याची सोय करणे, शिवाय हे करून चित्रपटाशी संबंधित एडिटिंग, मिक्सिंग, फिल्म डेव्हलपिंग, कॅमेरा असिस्टंट, स्पॉट बॉय या भूमिका देखील त्यांनी पार पाडल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs PAK: पाकडे नाही सुधारणार! LIVE सामन्यात शिवीगाळ करत 'लज्जास्पद' कृत्य Watch Video

Morjim Beach: गोव्याच्या 'मोरजी बीच'वर बैलांची झुंज, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल Watch Video

Delhi Blast: दिल्ली स्फोट प्रकरण, 'आय 20' कारचा मालक आमिर अटकेत; दहशतवादी डॉ. उमरसोबत आखली होती स्फोटाची योजना

Viral Video: पैशांसाठी तरुणीला शिवीगाळ, MNS कार्यकर्ते आक्रमक; परप्रांतीय तरुणाला कार्यालयात बोलावून चोपलं

Gautam Gambhir Angry: "टेम्बा बावुमाची बॅटिंग पाहा..." टीम इंडियाच्या 'फ्लॉप शो'वर गंभीर भडकला; फलंदाजांच्या क्षमतेवर थेट प्रश्नचिन्ह Watch Video

SCROLL FOR NEXT