Actor-Producer Sachin Joshi  dainikgomantak
मनोरंजन

मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात सचिन जोशीला जामीन

मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात सचिन जोशीला जामीन, 30 लाखांचा जामीनासह देश सोडण्यास बंदी

दैनिक गोमन्तक

मुंबई : अभिनेता-निर्माता सचिन जोशी याला मुंबईतील विशेष पीएमएलए न्यायालयाने मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात काही अटीं आणि शर्तींसह जामीन मंजूर केला आहे. 'जॅकपॉट' सारख्या काही चित्रपटात काम केलेल्या सचिन जोशीला गेल्या वर्षी १४ फेब्रुवारीला अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) अटक केली होती. 37 वर्षीय सचिन जोशी अभिनयासोबतच व्यवसाय देखील करतो आणि सध्या तो प्रकृतीच्या कारणामुळे सर्वोच्च न्यायालयाकडून अंतरिम जामिन घेऊन बाहेर आला आहे. सचिन जोशी यांच्यावर, त्याच्या कंपनीमार्फत 410 कोटी रुपयांच्या कर्जासाठी मनी लाँड्रिंग करण्यात आल्याचा आरोप ईडीने केला होता. तर त्यांच्या तपासात लाँड्रिंग करण्यात आल्याचे समोर आल्याचा दावाही ईडीने केला आहे. या प्रकरणी सचिन जोशी, ओंकार रियल्टर आणि डेव्हलपर्सचे अध्यक्ष कमल किशोर आणि व्यवस्थापकीय संचालक बाबूलाल वर्मा यांनाही अटक करण्यात आली होती. सध्या सचिनशिवाय दोघेही तुरुंगात आहेत. (Court grants bail to Sachin Joshi in money laundering case)

सचिनला (Actor-producer Sachin Joshi) जामीन मंजूर करताना विशेष न्यायाधीश एम जी देशपांडे यांनी ३० लाख रुपयांचा जातमुचलक आणि तेवढ्याच रकमेच्या जामीन (personal bond) देण्याचा आदेश दिला आहे. तसेच त्याला पुढील आदेशापर्यंत देश सोडता येणार नाही. तर पासपोर्ट ही ईडीकडे (Enforcement Directorate) जमा करावा लागेल. या प्रकरणाच्या तपासात (investigation) अडथळा येईल असे कोणतेही काम सचिनने करू नये, तसे करणे हा देखील गुन्हा मानला जाईल, असे न्यायालयाने सचिनला सांगितले आहे.

तर या जामीनाला विरोध करताना ईडीच्या (ED) वकील कविता पाटील यांनी कोर्टाकडे (court) तीन आठवड्यांचा अवधी मागितला. तसेच या आदेशाला स्थगिती देण्याची मागणी केली होती. मात्र, न्यायालयाने त्यांची मागणी फेटाळून लावत, तपास यंत्रणा अद्याप गुन्ह्यात त्याचा सहभाग सिद्ध करू शकलेली नाही असे न्यायालयाने म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Umrah Pilgrims Accident: सौदी अरेबियात भीषण अपघात! मदिनाजवळ टँकरला धडकून बसला आग, 42 भारतीय यात्रेकरूंचा दुर्दैवी मृत्यू

Bihar Election Goa Impact: गोव्याच्या दृष्टीनेही 'बिहार' निकालाचा विचार करणे गरजेचे..

Mhadei Land: 'गोवा मुक्तीच्या आधीपासून लोक इथे राहताहेत'; घर, उत्पन्नाची जागा सोडून अभयारण्य निश्चित करा; म्हादईतील भूमिपुत्रांची मागणी

'यापुढे पारंपरिक सहकारी संस्थांना परवानगी देण्यात येणार नाही'! CM सावंतांचे प्रतिपादन; कर्ज बुडव्‍यांचे प्रमाण वाढल्याचा दावा

Goa Crime: भररात्री क्राईम ब्रांचची धडक कारवाई! म्हापसा हॉटेलमधून 2 अल्पवयीन मुलींची सुटका, मानवी तस्करांना अटक

SCROLL FOR NEXT