Ranveer Singh photoshoot Dainik Gomantak
मनोरंजन

Ranveer Singh Nude Photoshoot: रणवीर सिंगच्या अडचणीत वाढ ; 'न्यूड' फोटोशूट पडले महागात

Ranveer Singh Photoshoot:रणवीर सिंगच्या नव्या फोटोशूटने चांगलेच अडचणी आणले आहे.

दैनिक गोमन्तक

बॉलिवूडचा स्टाइल ऑयकॉन असलेला अभिनेता रणवीर सिंह सध्या त्याच्या न्यूड फोटोंशूटमुळे चर्चेत आला आहे. त्याच्यावरती काही लोकांकडून टिका होत आहे. तर काही लोक ती त्याची मर्जी म्हणत त्याच्या न्यूड फोटोशूटचं (Ranveer Singh Photoshoot) समर्थन करत आहेत. यावर दोन्ही बाजूने प्रतिक्रिया उमटत असताना यात आणखी एक मोठी अपडेट समोर आली आहे.

ती म्हणजे रणवीर सिंगच्या या न्यूड फोटोशूट विरोधात चेंबूर पोलीस ठाण्यात (Mumbai Police) तक्रार दाखल झाली आहे. मात्र पोलिसांनी यामध्ये अद्याप या FIR दाखल केलेला नाही. मात्र तक्रार दाखल झाल्याने आता हे न्यूड फोटोशूटचं प्रकरण रणवीर सिंगला भोवणार का? असा सवाल उपस्थित होत आहे. यावरूनच समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी यांनीही रणवीर सिंगवर टीका केली होती.

*अनेकांकडून टीका होत आहे

रणवीर सिंग याचं हे वादग्रस्त फोटोशूट आल्यानंतर समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी यांनी यावर प्रश्न उपस्थित केले होते. एखाद्या अभिनेत्याचे नग्न फोटो चालतात मात्र मुलींनी त्यांच्या मर्जीने हिजाब घातलेला चालत नाही. हे आपण कोणत्या सांस्कृतिककडे चाललो आहे. असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता. तसेच इतरही अनेक लोकांनी यावर टीका केली होती.

मात्र बॉलिवूड मधील काही मंडळी ही रणवीर सिंगच्या समर्थनार्थ उभी आहेत. त्याला जे योग्य वाटल ते त्यानं केलं. तो त्यात कम्फर्टेबल असेल तर त्याने ते करावं. त्याने काय करावं आणि काय न करावं हे सांगणारे आपण कोण? अशी भूमिका अनेक बॉलीवूडच्या मंडळींनी घेतली होती.

रणवीरच्या न्यूड फोटोशूटमुळे सध्या सुरू असलेल्या चर्चा आणि काँट्रोवर्सीचा रणवीरला मात्र काहीही फरक नसल्याचं त्यानं म्हटलं आहे. एका मॅग्झीनला दिलेल्या मुलाखतीत तो म्हणाला, 'लोक माझे कपडे आणि फॅशनबाबत काय बोलतात या गोष्टीचा मला काहीही फरक पडत नाही. त्यांना जे कपडे घालायला आवडतात तेच कपडे ते घालतात ते जेवण ते जेवतात. माझ्याविषयी कोणाला हरकत असेल तर मला त्याच्या कोणताही फरत पडत नाही'.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT