Shweta Tiwari Dainik Gomantak
मनोरंजन

वादग्रस्त वक्तव्य भोवलं, श्वेता तिवारीविरोधात तक्रार दाखल

या वादग्रस्त विधानाबाबत आता हिंदू संघटनांनी टीकेची झोड उठवली आहे.

दैनिक गोमन्तक

प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता तिवारीने (Shweta Tiwari) नुकतेच एक वादग्रस्त वक्तव्य केले, ज्यामुळे हिंदू धर्माच्या लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. तीने आपल्या अंतर्वस्त्राच्या आकाराबाबत एक वक्तव्य केले आणि देवदेवतांचा त्यात उल्लेख केला ज्यामुळे लोक संतापले. या वादग्रस्त विधानाबाबत आता हिंदू संघटनांनी टीकेची झोड उठवली आहे. (Shweta Tiwari Latest News)

आता, मध्य प्रदेशातील भोपाळमधील श्यामला हिल्स पोलीस ठाण्यात धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करत श्वेतावर एफआयआर (FIR) दाखल करण्यात आला आहे. श्वेताच्या आगामी वेब सीरिजच्या पत्रकार परिषदेत संपूर्ण वाद सुरू झाला ज्यामध्ये तिचे सहकलाकार रोहित रॉय, सौरभ राज जैन आणि दिगंगना सूर्यवंशी यांची उपस्थिती होती.

काय आहे प्रकरण?

बुधवारी श्वेता तिवारी तिच्या आगामी वेब सीरिजच्या घोषणेसाठी भोपाळला पोहोचली होती. जिथे तिने आपल्या संपूर्ण टीमसह पत्रकार परिषदेत भाग घेतला. येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना श्वेता तिवारीचे वादग्रस्त वक्तव्य समोर आले. श्वेता तिवारी म्हणाली, 'माझ्या ब्रा ची साईज देवच घेत आहेत' तेव्हापासून सोशल मीडियावर श्वेताला फटकारले जात आहे. श्वेता तिवारी आणि रोहित रॉय सारखे सेलिब्रिटी काल भोपाळमध्ये फॅशनशी संबंधित वेब सिरीज 'शो स्टॉपर' (Show Stopper) ची घोषणा करण्यासाठी आले होते. श्वेताने भोपाळमध्ये मीडियासमोर लोकांची मने दुखावणारी ही गोष्ट बोलून स्वत:लाच अडचणीत आणले आहे. यादरम्यान, स्टेजवरील चर्चेत श्वेता तिवारीने गंमतीने हे वादग्रस्त विधान केले होते असेही म्हटले जात आहे.

अगदी अभिनेत्रीने दिलेले वक्तव्य भोपाळ निंदनीय आहे. भोपाळचे पोलीस आयुक्त मकरंद देउस्कर यांना वस्तुस्थिती आणि संदर्भ तपासण्याचे आणि 24 तासांत अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, ज्याच्या आधारे निर्णय घेतला जाईल. श्वेता तिवारीच्या व्यावसायिक आघाडीबद्दल सांगायचे तर, अभिनेत्री दोन दशकांहून अधिक काळ मनोरंजन उद्योगाचा एक भाग आहे. तिने टेलिव्हिजनवर कसौटी जिंदगी की, बिग बॉस, मेरे डॅड की दुल्हन, बेगूसराय यासह लोकप्रिय कार्यक्रम केले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

Goa News: अडवलपालमध्ये गढूळ पाण्याचा पुरवठा, 'फोमेंतो' कंपनीच्या रिजेक्शनमुळे समस्या; वाचा गोव्यातील दिवसभरातील ठळक घडामोडी

SCROLL FOR NEXT