Kaun Banega Crorepati 14 Dainik Gomantak
मनोरंजन

तुमची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी लवकरच सुरू होतोय 'कौन बनेगा करोडपती 14'

Kaun Banega Crorepati 14 शो 9 एप्रिल, रात्री 9 वाजता फक्त सोनीवर (Sony India) सुरू होत आहे.

दैनिक गोमन्तक

Kaun Banega Crorepati 14: मेगास्टार अमिताभ बच्चन लवकरच प्रेक्षकांसाठी 'कौन बनेगा करोडपती 14' हा सर्वांचा आवडता घेऊन परतत आहेत. टीव्हीच्या या हिट शोचा प्रोमो निर्मात्यांनी रिलीज केला आहे, ज्यामध्ये अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी नोंदणी कधी सुरू करू शकतात हे सांगताना दिसत आहेत.

KBC 14' चा हा प्रोमो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. प्रेक्षकांनी पुन्हा एकदा या गेम शोची तयारी सुरू केली आहे. सर्वांनीच कंबर कसली आहे. नोंदणीच्या तारखांची घोषणा ऐकून सगळेच उत्साही झाले आहेत. येत्या KBC 14 प्रोमोची सुरुवात एका तरुण जोडप्याने केली आहे. नवरा बायकोला वचन देतो की तो तिला स्वित्झर्लंडला घेऊन जाईल, मोठे घर घेईल, मुलांना उत्तम शिक्षण देईल. पतीच्या या सर्व गोष्टी ऐकून पत्नी आनंदी होते आणि स्वप्न पाहू लागते. काही वर्षांनी हे जोडपे म्हातारे झाले. नवरा पुन्हा बायकोला तेच वचन देताना दिसतो, पण यावेळी बायको खूश नाही तर रागावली आहे. यामध्ये अमिताभ बच्चन यांचा आवाज येतो.

अमिताभ बच्चन म्हणतात, स्वप्ने पाहून आनंदी होऊ नका, ती पूर्ण करण्यासाठी फोन उचला. 9 एप्रिल, रात्री 9 वाजता फक्त सोनीवर (Sony India) सुरू होत आहे, माझे प्रश्न आणि तुमची उत्तरे. या प्रोमोमध्ये अमिताभ बच्चन निळ्या रंगाचा सूट घालून खुर्चीवर बसलेले दिसत आहेत. हा प्रोमो पाहून चाहते खूप खूश झाले आहेत आणि 9 एप्रिलच्या आगमनाची वाट पाहत बसले आहेत.

'कौन बनेगा करोडपती' 2000 सालापासून टीव्हीवर येत आहे. या शोचा प्रत्येक सीझन अमिताभ बच्चन यांनी होस्ट केला आहे, फक्त तिसरा सीझन शाहरुख खानने होस्ट केला होता, पण तो प्रेक्षकांमध्ये आपले स्थान निर्माण करण्यात मात्र अपयशी ठरला. गेल्या वर्षी या शोने त्याचे एक हजार भाग पूर्ण केले आहेत. यावेळी अमिताभ बच्चन यांची मुलगी श्वेता बच्चन आणि नात नव्या नवेली नंदा या विशेष पाहुण्या म्हणून उपस्थित झाल्या होत्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mumbai Goa Highway Accident: मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात! कारची दुचाकीला धडक, महिलेचा जागीच मृत्यू

Team India: इंग्लंड दौरा संपला, आता टीम इंडिया वेस्ट इंडिजशी करणार दोन हात; मायदेशात खेळणार कसोटी मालिका

Goa Assmbly: थकबाकीदारांसाठी प्रीपेड स्मार्ट मीटर बसवा, आमदार निलेश काब्राल यांची मागणी; वाचा दिवसभरातील घडामोडी

नाव, आडनावात बेकायदेशीरपणे बदल कराल तर खबरदार; तीन वर्षापर्यंत होऊ शकते शिक्षा, अधिवेशनात लक्षवेधी

IND vs ENG: रवींद्र जडेजाची गोलंदाजी अन् जो रुटचा रेकॉर्ड, रचला नवा इतिहास; अशी कामगिरी करणारा ठरला जगातील पहिलाच!

SCROLL FOR NEXT