Deepika - Ranveer Dainik Gomantak
मनोरंजन

'कॉफी विथ करन'मध्ये दीपिका- रणवीरच्या प्रेमप्रकरणाचे रहस्य उलगडणार...

Rahul sadolikar

Ranaveer sing Deepika Padukone in Coffee With Karan : कॉफी विथ करन हा शो आता पुन्हा एकदा सेलिब्रिटींच्या गुप्त गोष्टी उघड करायला सज्ज झाला आहे. नव्या सीजनमध्ये करन अनेक सेलिब्रिटी कपल्सशी संवाद साधणार आहे. नुकतीच यातल्या एका प्रसिद्ध कपलची झलक समोर आली आहे.

करण जोहरच्या 'कॉफी विथ करण' या चॅट शोचा प्रत्येक सीझन कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो. शोचा ८वा सीझन लवकरच ऑन एअर होणार आहे. बातमीनुसार, करणच्या शोचे पहिले पाहुणे दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग असतील. 

शोचा पहिला प्रोमो व्हिडिओ रिलीज झाला आहे. ज्यामध्ये दीपिका आणि रणवीर करणच्या शोमध्ये दिसत आहेत. बी-टाऊनच्या या स्टार कपलला एकत्र पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत. या शोमध्ये दीपिका आणि रणवीर अनेक खास गुपिते उघड करणार आहेत.

'कॉफी विथ करण सीझन 8' च्या प्रोमो व्हिडिओमध्ये दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग स्वतःशी संबंधित एक मोठे रहस्य उघड करताना दिसत आहेत. 

या स्टार कपलने २०१५ मध्ये एंगेजमेंट केली होती. दीपिका-रणवीरने करणच्या शोमध्ये सांगितले की, दोघांनी २०१५ मध्ये गुपचूप एंगेज केले होते. 

समोर आलेल्या प्रोमो व्हिडिओमध्ये करण जोहर रणवीर सिंगचे कौतुक करताना दिसत आहे. शोच्या प्रोमोमध्ये रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण ब्लॅक आउटफिटमध्ये दिसत आहेत. 

त्याचवेळी करण जोहरनेही काळ्या रंगाचा आउटफिट परिधान केला आहे. यासोबतच कॉफी विथ करण सीझन 8 चा सेटही ब्लॅक अँड व्हाईट कलरमध्ये ठेवण्यात आला आहे. जेव्हा करण जोहरने दीपिका आणि रणवीरला स्मोकिंग हॉट म्हटले तेव्हा रणवीर सिंगने उत्तर दिले - थँक्स थरकी काका. रणवीरच्या या उत्तरावर करण गप्प बसला.

व्हिडिओमध्ये दीपिका पदुकोण सांगत आहे की तिची सर्वोत्तम केमिस्ट्री अभिनेता हृतिक रोशनसोबत आहे. जेव्हा करण जोहरने दीपिकाला विचारले की पती रणवीर सिंग व्यतिरिक्त तिची कोणत्या अभिनेत्यासोबत उत्तम केमिस्ट्री आहे. 

यावर दीपिकाने सांगितले की, तिची हृतिक रोशनसोबतची केमिस्ट्री सर्वोत्कृष्ट आहे, ज्याची प्रत्येकजण आतुरतेने वाट पाहत आहे. दीपिका आणि हृतिकची जोडी 'फायटर' चित्रपटात दिसणार आहे. 

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT