Celebrities Tribute to Dilip Kumar  Dainik Gomantak
मनोरंजन

बॉलीवूडच्या 'सौदागराला" अनेक दिग्गजांची श्रद्धांजली !

दैनिक गोमन्तक

ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार(Dilip KUmar) यांचे सकाळी7.30 वाजता निधन झाले . वयाच्या 98 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलं आहे. दिलीप कुमार यांनी आज सकाळी मुंबईच्या हिंदुजा रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला आहे .

दिलीप कुमारांनी1960 च्या दशकात अनेक अभिजात हिंदी भाषेच्या चित्रपटांमध्ये या दिग्गज अभिनेत्याने महत्त्वपूर्ण भूमिका केल्या आहेत . या चित्रपटांपैकी काही चित्रपटांमध्ये मुगल-ए-आजम, देवदास, नया दौड़, गंगा जुम्ना, राम और श्याम आणि इतरांचा समावेश आहे.त्यांची गाणे आजही तरुणाईला भुरळ पाडतात.

या दिग्गज अभिनेत्याच्या जाण्याने चित्रपट श्रुष्टीसह संपूर्ण देश हळहळला आहे. अनेक चाहते आपल्या लाडक्या कलाकाराला निरोप देताना सोशल मीडियावर

भावुक झालेले पाहायला मिळत आहेत तसेच अनेक दिग्गज नेते असतील किंवा सिने श्रुष्टीतील अनेक कलाकार असतील तेही दिलीप कुमारा यांना श्रद्धांजली देताना भावुक झालेले पाहायला मिळाले.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही आपला शोक व्यक्त केला आहे सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहताना "दिलीपकुमार जी सिनेसृष्टीतील आख्यायिका म्हणून लक्षात राहतील. त्याला अतुलनीय तेजोमय आशीर्वाद मिळाला, ज्यामुळे पिढ्यान्पिढ्या प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले. त्यांचे निधन आमच्या सांस्कृतिक जगाचे नुकसान आहे. त्याचे कुटुंब, मित्र आणि असंख्य प्रशंसकांना सहानुभूती RIP."अशा शब्दात त्यांनी दिलीप कुमार यांना आदरांजली वाहिली

"ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांच्या निधनाबद्दल ऐकून दु: खी झाले. आम्ही एक आख्यायिका गमावली. शोकाकुल कुटुंब आणि चाहत्यांविषयी तीव्र संवेदना" या शब्दात शरद पवार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

तसेच कॉंग्रेसचे खासदार आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी सुद्धा ट्विटरवर त्यांना आदरांजली वाहिली आहे. "दिलीपकुमार जी यांच्या कुटुंबीय, मित्र आणि चाहत्यांविषयी माझे मनःपूर्वक दु: ख.भारतीय चित्रपटसृष्टीतले त्यांचे विलक्षण योगदान पुढच्या पिढ्यांसाठी लक्षात राहिल." या शब्दांत त्यांनी आपले दुःख व्यक्त केले आहे.

तसेच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी "भारतीय चित्रपटसृष्टीला समृद्ध करणारा, रूपेरी नभांगणातला लखलखता तारा निखळला. अजरामर भूमिका साकारणारे दिलीप कुमार यांचे चित्रपटप्रेमी, चाहत्यांच्या हृदयातील स्थानही अजरामर राहील. ज्येष्ठ अभिनेते पद्मविभूषण दिलीप कुमार यांना भावपूर्ण श्रद्धांजली."म्हणत दिलीप कुमार यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

यासोबतच हिंदी सिनेश्रुष्टीतूनही अनेक दिग्गज कलाकारांनीही आपल्या लाडक्या अभिनेत्याला आश्रू नयनांनी निरोप देताना सोशल मीडियावर आपले दुःख व्यक्त केले आहे.

"एखादी संस्था गेली आहे .. जेव्हा जेव्हा भारतीय सिनेमाचा इतिहास लिहीला जाईल, तो नेहमी 'दिलीप कुमारच्या आधी आणि दिलीपकुमार नंतर' असावा.

त्याच्या आत्म्याच्या शांतीसाठी आणि माझ्या कुटुंबाला हे नुकसान सहन करण्यासाठी सामर्थ्य मिळावे यासाठी माझे दुआ .. एकत्र पाम्स अप एकत्रित पाम्स एकत्र एकत्र गंभीरपणे दु: खी" या शब्दात बीग-बी अमिताभ बच्चन यांनी आपले दुःख व्यक्त केले आहे.

मनोज बाजपेयी यांनीही दिलीप कुमार यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

फरहान अख्तर यानेही ट्विट करत आपले दुःख व्यक्त केलं आहे

तर तुम्ही अनेक गोष्टीत मला तयार केलं मात्र तुमच्या निधनाची बातमी ऐकण्यासाठी मात्र तयार केलं नाही असे म्हणत अजय देवगन याने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

तर महापुरुष कुठेही जात नाहीत,ते फक्त स्टेज बदलतात.असे म्हणत सोनू सूद याने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

आज अभिनयाच्या या बादशहाला नशिबाने गुंगारा दिला आणि ट्रॅजेडी किंग साऱ्या जगाचा निरोप घेत एका नव्या पटलावर आपल्या अभिनय आणि व्यक्तिमत्वाचा ठसा उमटणवण्यसाठी जगाला सोडून गेला.

आयुष्यात यशाच्या आणि अभिनयाच्या सर्वोत्कृष्ट शिखरावर असूनही ज्यांचे पाय कायम जमिनीवर होते अशा अभिनयाच्या अवलियाला आमची भावपूर्ण श्रद्धांजली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

बॉलीवूड, टॉलीवूडचा प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक जानी मास्टरला गोव्यात अटक, सहकारी महिलेचा 6 वर्षापासून लैंगिक छळ केल्याचा आरोप

Ratnagiri Crime News: स्वप्नात दिसला मृतदेह, सिंधुदुर्गातील तरुण पोहोचला पोलीस ठाण्यात; तपासात उघड झाली धक्कादायक माहिती

तम्नार प्रकल्प रखडणार! कर्नाटकचे शेपूट वाकडेच, सिद्धरामय्यांनी कळसा-भांडुराचा मुद्दा केला उपस्थित

रस्त्यांच्या अवस्थेवरुन काँग्रेस आक्रमक; दहा दिवसांत काम सुरु न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा

फोंड्यात 'हेडा गॅब्लर'चा प्रयोग; 125 वर्षापूर्वी लिहलेले नोर्वेजियन नाटककाराचे नाटक पाहण्याची संधी

SCROLL FOR NEXT