Sameer Wankhede Controversy Dainik Gomantak
मनोरंजन

Sameer Wankhede Controversy : समीर वानखेडे आणखी अडकणार? CBI कोर्टात म्हणाले....

एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

Rahul sadolikar

आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात CBI च्या रडारवर असणारे एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. सीबीआयने कोर्टात मांडलेल्या आपल्या भूमीकेत असं म्हटलं आहे की समीर वानखेडे यांच्यावरील आरोप हे तथ्यांवर आधारित आहे.

थोडक्यात CBI समीर वानखेडे यांच्यावर दाखल केलेल्या आरोपांवर ठाम आहे. या बातमीने समीर वानखेडे हे या प्रकरणात आणखी अडकण्याची शक्यता आहे.

आर्यन खानचे प्रकरण आणि CBI

एनसीबीचे माजी अधिकारी समीर वानखेडे यांच्या अडचणी पुन्हा एकदा वाढू लागल्या आहेत. सीबीआयने समीर वानखेडे आणि इतर अनेक आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केलेला असताना आता CBI ने दाखल केलेल्या गुन्ह्यांवर ठाम असल्याचे कोर्टात सांगितले आहे

शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला ड्रग्ज प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप वानखेडे यांच्यावर आहे. यानंतर सीबीआयने (CBI) दिल्ली, मुंबई आणि रांचीसह 29 ठिकाणी एकामागून एक छापे टाकले होते. यानंतर वानखेडेंवर भ्रष्टाचाराचा गुन्हाही दाखल करण्यात आला होता.

NCB चे CBI ला पत्र

दरम्यान, लाचखोरी प्रकरणात वानखेडे आणि इतरांची चौकशी करण्यासाठी एनसीबीने सीबीआयला पत्र लिहिले होते. विशेष तपास पथकाने (एसआयटी) कॉर्डेलिया छाप्यात तफावत आढळून आल्यानंतर आणि आर्यन खानला क्लीन चिट दिल्यानंतर समीर वानखेडे संशयाच्या भोवऱ्यात सापडले होते.

गेल्या वर्षी वानखेडे यांना एनसीबीमधून काढून टाकण्यात आले होते. वानखेडे हे सध्या चेन्नई (Chennai) येथील डायरेक्टर जनरल ऑफ टॅक्सपेयर्स सर्व्हिसेस (DGTS) च्या कार्यालयात तैनात आहेत.

मॉडेलचा गंभीर आरोप

दोन वर्षापूर्वी क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणामध्ये एनसीबीने ३ ऑक्टोंबरला मॉडेल मुनमुन धमेचा हिला अटक केली होती. यावेळी ती चांगलीच चर्चेत आली होती. दरम्यान आता ती पुन्हा चर्चेत आली आहे. वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

ही केस त्याकाळात देशभरात चर्चेचा विषय झाली होती, आपल्या लाडक्या लेकाचा वाचवण्यासाठी शाहरुख खानने वकिलांची फौजच उभी केली होती. काही काळाने आर्यन खानची या प्रकरणातून सुटका झाली ;पण त्याला अटक करणारे समीर वानखेडे मात्र या प्रकरणात चांगलेच अडकले आहेत.मिड-डे ला दिलेल्या माहितीनुसार, मुनमुन धमे भीतीपोटी गप्प बसली होती. पण आता सीबीआयने वानखेडे यांच्यावर गुन्हा दाखल केल्याने सत्य बाहेर येईल. अशी अपेक्षा आहे.

शाहरुखच्या मॅनेजरचा आरोप

आर्यन खानच्या कथित ड्रग्ज प्रकरणाची चर्चा गेले काह दिवस सुरू आहे. या प्रकरणात एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांनी चुकीची कारवाई करत लाच मागितल्याचा आरोप CBI च्या चार्जशीटमध्ये करण्यात आला होता.

त्यानंतर त्यांची दिल्ली इथल्या CBI कार्यालयात चौकशीही करण्यात आली. यादरम्यान शाहरुख खानची मॅनेजर पूजा ददलानीने समीर वानखेडे यांच्यावर 25 कोटींची लाच मागितल्याचा आरोप केला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Village Tourism: "आम्हाला प्रकल्प हवाच!" सुर्ला ग्रामस्थांकडून इको-टुरिझमचे स्वागत; शासनाच्या प्रकल्पाला ग्रामसभेचा पाठिंबा

TCS Layoff: मोठी बातमी! टीसीएस देणार 12,000 जणांना नारळ; सीईओ म्हणाले, 'भविष्यासाठी गरजेच...'

Goa Live News: नागपंचमीसाठी नागोबा सज्ज

Bison In Sawantwadi: एक, दोन नव्हे… थेट 15 गवारेड्यांचा धुमाकूळ! लोकांना फुटला घाम, पाहा थरकाप उडवणारा VIDEO

तुम्हालाही विनाकारण राग येतोय? सावधान! असू शकते रक्तातील साखरेच्या बदलांचे लक्षण, 'या' गोष्टी ठेवा लक्षात

SCROLL FOR NEXT