Shahid Kapoor- Kriti Senon Dainik Gomantak
मनोरंजन

Box Office Collection: शाहीद अन् क्रितीचा चित्रपट बॉक्स ऑफीसवर ठरला हीट; इतक्या कोटींची कमाई

Box Office Collection: हा चित्रपट तिसऱ्या आठवड्यातही चांगली कमाई करताना पाहायला मिळत आहे.

दैनिक गोमन्तक

Box Office Collection teri baaton mein aisa uljha jiya shahid kapoor kriti senon movie

शाहिद कपूर आणि क्रिती सेनॉनचा 'तेरी बातों में ऐसा उल्झा जिया' हा चित्रपट रिलीज होऊन 16 दिवस झाले आहेत आणि तो आता हिट झाला आहे. हा चित्रपट तिसऱ्या आठवड्यातही चांगली कमाई करताना पाहायला मिळत आहे.

दुसरीकडे, हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोण स्टारर 'फाइटर' रिलीज होऊन एक महिना पूर्ण झाला आहे. लाखांपर्यंत मर्यादित असलेली त्याची कमाई आता दररोज घसरत आहे. त्याच वेळी, या आठवड्यात प्रदर्शित झालेल्या 'आर्टिकल 370', 'क्रॅक' आणि 'ऑल इंडिया रँक' या तीन चित्रपटांच्या कमाईवरही परिणाम झाला आहे. तेरी बातों में ऐसा उल्झा जिया आणि 'फाइटर'ने आतापर्यंत एकूण किती कलेक्शन केले आहे आणि बॉक्स ऑफिसवर किती कमाई केली आहे हे जाणून घेऊयात.

मिळालेल्या माहितीनुसार, 'तेरी बातों में ऐसा उल्झा जिया' ने रिलीजच्या तिसऱ्या शनिवारी म्हणजेच 24 फेब्रुवारीला 2.3 कोटींची कमाई केली आहे. तर एक दिवस आधी या चित्रपटाची कमाई अडीच कोटी रुपये होती. तिसऱ्या शनिवारी 'तेरी बातों में ऐसा उल्झा जिया'च्या कमाईत 8% घसरण झाली.

आतापर्यंत चित्रपटाचे एकूण कलेक्शन 70.8 कोटींवर पोहोचले आहे. त्याचबरोबर जगभरात 'तेरी बातों में ऐसा उल्झा जिया'ने 120.8 कोटी रुपयांचे कमाई केली आहे. 23 फेब्रुवारी हा सिनेमा लव्हर्स डे होता, त्यामुळे सिनेमाच्या तिकिटांची किंमत फक्त 99 रुपये ठेवण्यात आली होती.

'तेरी बात में ऐसा उल्झा जिया'ला याचा खूप फायदा झाला. यामुळेच रिलीजच्या तिसऱ्या शुक्रवारी म्हणजेच 23 फेब्रुवारीला शाहिद आणि क्रितीच्या चित्रपटाने 2.5 कोटींची कमाई केली होती. अन्यथा त्याचे कलेक्शन केवळ 1.25-1.50 कोटी रुपये झाले असते.

आता या चित्रपटाने 70 कोटींचा टप्पा ओलांडला असून, 80 कोटींकडे चित्रपटाने वाटचाल सुरु केली आहे. 'तेरी बातों में ऐसा उल्झा जिया'चे लाइफटाईम कलेक्शन 80-90 कोटी असू शकते असा अंदाज आहे.75 कोटी बजेट असलेल्या या चित्रपटाने जगभरात 100 कोटींचा टप्पा ओलांडला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून गंडा घालणाऱ्या 'श्रुती'ला दिलासा; फोंडा कोर्टाकडून जामीन!

India Bike Week 2024: चित्तथरारक स्टंट, म्युझिक आणि बरंच काही...; गोव्यातील बाईक इव्हेंटच्या Date, Venue जाणून घ्या

Tribute to the Legends मिरामार किनारी सुदर्शन पटनाईक यांनी साकारले सिने जगतातील दिग्गजांचे Sand Art, पाहा फोटो

Goa Today's News Live: पाणी जपून वापरा; संपूर्ण बार्देश तालुक्यात दोन दिवस मर्यादीत पाणी पुरवठा

Goa Cyber Crime: गोवा पोलिसांनी दिला दणका, सायबर गुन्हेगारीत गुंतलेले तब्बल 152 मोबाईल नंबर 'ब्लॉक'

SCROLL FOR NEXT